

सिडको : जुन्या भांडणाच्या कुरापतीतून शिवसेना (शिंदे गट) विभागप्रमुख सुयेस पाटील यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) रात्री साडेआठच्या सुमारास सिडकोतील दत्तचौक परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे सेंट्रल पार्कच्या पाठीमागील त्यांच्या ‘सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ कार्यालयात असताना दोन ते तीन जणांच्या टोळक्याने अचानक येत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.