Nashik Water Reservation | नाशिककरांसह सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल 8005 दलघफू पाणी आरक्षणाची महापालिकेकडून मागणी

Nashik Water Reservation | महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; पालकमंत्री घेणार निर्णय
Water
WaterPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेसाठी निर्धारित पाणी आरक्षणाचे चक्र गुरुवारी (दि. १५) अखेर संपुष्टात आले असून, आगामी १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी धरणandून नाशिककरांना पिण्यासाठी ७३७० दलघफू, तर सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी ६३५ दलघफू अशाप्रकारे तब्बल ८००५ दललपक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे.

Water
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी (दि. १५) नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थित नाशिककरांसह सिंहस्थाच्या पाणी आरक्षणाचा फैसला होण्याची शक्यता सूत्रारांनी व्यक्त केली आहे.
नाशिककरांना पिण्यासाठी प्रामुख्याने गंगापूर धरण तसेच काही प्रमाणात मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागामार्फत धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा पालकमंत्र्यांकडून दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी महापालिका, उद्योग, औष्णिक विद्युत केंद्र एकलहरेंसह शेतीसाठी पाणीआरक्षण निश्चित केले जाते.

गत १५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरण समूहून ४६०० दलघफू, दारणा धरणातून २०० दलघफू, तर मुकणे धरणातून १६०० दलघफू अशाप्रकारे एकूण ६४०० दललक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२६ अखेर गंगापूर धरणातून ४३२३ दलघफू, दारणेतून २५६ दलघफू, तर मुकणेतून १४८० दलघफू.
महापालिकेची पाणी आरक्षणाची मागणी (आकडे दलघफू)

  • गंगापूर धरण: नाशिककरांसाठी ४४८० दलघफू, भाविकांसाठी ६५ दलघफू

  • दारणा धरण: नाशिककरांसाठी २३० दलघफू, भाविकांसाठी ०० दलघफू

  • मुकणे धरण: नाशिककरांसाठी १७०० दलघफू, भाविकांसाठी ५७० दलघफू

  • एकूण: नाशिककरांसाठी ७३७० दलघफू, भाविकांसाठी ६५३ दलघफू

Water
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

अशाप्रकारे एकूण ६०६१ दलघफू पाणीआरक्षणाचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा असल्याने पाणी आरक्षणाचा कालावधी वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीकरिता नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरणातून ४४८० दलघफू, दारणा (चेहेडी बंधाऱ्यातून) २३० दलघफू, तर मुकणेतून १७०० दलघफू अशा प्रकारे ७३७० दलघफू पाणीआरक्षणाची आवश्यकता भासणार आहे.

सिंहस्थासाठी पाण्याचे स्वतंत्र नियोजन
सिंहस्थ काळात नाशिकमध्ये सुमारे १० कोटी भाविक, साधू-महंत येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्यासाठी गंगापूर धरणातून अतिरिक्त ६५ दलघफू, तर मुकणेतून ५७० दलघफू अशाप्रकारे एकूण ६३५ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी स्वतंत्रपणे नोंदवण्यात आली आहे. नाशिककरांना पिण्यासाठी ७३७० व सिंहस्थासाठी ६३५ अशाप्रकारे एकूण ८००५ दलघफू पाणी मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news