Nashik Rural Police Transfer | पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बदली

Vikram Deshmane । बृहन्मुंबईत मध्य प्रादेशिक विभागात अपर पोलिस आयुक्तपदी बदली
नाशिक, Superintendent of Police (SP) Vikram Deshmane
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बृहन्मुंबईत मध्य प्रादेशिक विभागात अपर पोलिस आयुक्तपदी बदली. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बृहन्मुंबईत मध्य प्रादेशिक विभागात अपर पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. तर या रिक्त पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यापदी कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्य शासनाने शुक्रवारी (दि. १६) राज्यातील १४ भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. त्यानुसार देशमाने यांची मुंबईत बदली झाली आहे. देशमाने यांनी नाशिक पोलिस अधीक्षकपदाचा फेब्रुवारी २०२४ मध्ये पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करीत गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली. पोलिस दलातील पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी उपक्रम राबवले. दरम्यान, त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

साळवे सहसंचालकपदी

महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे सह संचालकपदी अरविंद साळवे यांची नियुक्ती झाली आहे. साळवे याआधी महाराष्ट्र राज्य महामार्ग सुरक्षा विभागात पोलिस अधीक्षकपदी सेवा बजावत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news