Nashik Road Railway Station | नाशिकरोड रेल्वे स्थानकाला बॅटरी कारची प्रतीक्षा

कुंभमेळ्यात प्रवाशांना गुणात्मक सेवेची वाढविण्याची प्रवाशी संघटनेची मागणी
Nashik Road Central Railway Shegaon Railway Station
नाशिकरोड : मध्य रेल्वेने शेगाव रेल्वे स्थानकावर कार्यान्वित केलेली बॅटरी.(छाया : सुधाकर गोडसे)
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : नाशिक रोड रेल्वे स्थानकाला बॅटरी कारची गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानक हे उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे रेल्वेस्थानक समजले जाते. प्रवाशांना ये-जा करण्यापासून तर त्यांचे लगेज स्थलांतर करण्यापर्यंत मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकात अनेक ठिकाणी बॅटरीकार उपलब्ध आहेत. मात्र, नाशिक रोड येथे बॅटरीकार उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. येणारा कुंभमेळा आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या दर्जात्मक आणि गुणात्मक सेवांमध्ये बॅटरी कारचा समावेश करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. (Nashik Road Railway Station has been waiting for a battery car for the past several years)

नाशिकरोड रेल्वे स्थानकात सध्या सरकते जिने कार्यान्वित आहेत. त्याचप्रमाणे चारही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. फलाट एक ते चारवर सरकते जिने कार्यान्वित करण्यात आहेत. अनेक प्रवाशांना यामुळे प्रवास करणे सुकर झाले आहे. मात्र, अनेक वर्षापासून बॅटरी कारची प्रतीक्षा नाशिकरोड रेल्वे स्थानकाला आहे. बॅटरी कार प्रवाशांना नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरून थेट प्लॅटफॉर्म एक ते चारपर्यंत घेऊन जाऊ शकते. मात्र, सध्या बॅटरीकार नसल्यामुळे अनेक वेळा सामान ने- आणीसाठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा कुलींची मदत घेतली जाते. मात्र, प्रवाशांना बऱ्याच वेळा कुलींचे दर देणे परवडत नाहीत. वयोवृद्ध व्यक्तींना प्लॅटफॉर्म एक ते चार पर्यंत पोहोचवण्यासाठी बॅटरी कार ही गरजेची विषय वस्तू असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येणारा कुंभमेळा ध्यानात घेऊन नाशिक रोड रेल्वे स्थानकात किमान चार ते पाच बॅटरी कार कार्यान्वित करावयाची मागणी केली जात आहे.

असा आहे अडथळा

बॅटरीवर चालणारी बॅटरी कार चालवण्यासाठी ठराविक एजन्सीला हे काम दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून दोन, तीन वर जाण्यासाठी सपाट पादचारी पुल करावा लागणार आहे. बॅटरी कार सध्या तरी प्लॅटफॉर्म एक, दोन, तीन आणि चारसाठी स्वतंत्र द्यावी लागेल. बॅटरी कारची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी वेगळे रॅम्प वॉक बांधावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्यात सदर खर्च समाविष्ट करण्यात यावे, अशी अपेक्षा प्रवासी संघटनेने केली आहे.

येणारा कुंभमेळा ध्यानात घेऊन बॅटरीकार प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित करणे आवश्यक आहे. वयोवृद्ध व्यक्ती गरोदर महिला यांना ही अत्यावश्यक सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. भुसावळ, शेगाव व इतर मोठ्या रेल्वे स्थानकात बॅटरीकार कार्यान्वित आहे. मात्र नाशिकरोडला नाही, ही शोकांतिका आहे.

राजेश फोकणे, सामाजिक कार्यकर्ते, नाशिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news