Nashik Ram Rath Yatra Utsav | आज रामरथ - गरुड रथानिमित्त जाणून घ्या पर्यायी मार्ग

Traffic diversions today for Rath Yatra : साध्या वेशात २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गात बदल
Road Closed, Diversion, Nashik
वाहतूक मार्गात बदलPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पंचवटी परिसरात मंगळवारी (दि. ८) रामरथ व गरुड रथाची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत असल्याने या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

Summary

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, गर्दीमध्ये साध्या वेशातील सुमारे २०० पोलिस अधिकारी-अंमलदारही तैनात राहणार आहेत. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

सालाबादाप्रमाणे यंदाही भाविकांना रामरथ आणि गुरुडरथ मिरवणुकीचे वेध लागले आहेत. पंचवटीत मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून मिरवणुकीस मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सुरुवात होईल. तर गरुड रथाची मिरवणूक रामरथापाठोपाठ निघणार आहे. मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामरथ मिरवणूक मार्ग

काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून सुरुवात - नागचौक - चरण पादूका चौक - लक्ष्मण झुला पुल - काट्या मारुती - गणेशवाडी रोड - महात्मा फुले पुतळा - आयुर्वेदिक हॉस्पिटल - मरिमाता रोडने गौरी पटांगण - म्हसोबा पटांगण - कपालेश्वर मंदिर - रामतीर्थ - परशुराम पुरिया रोडने मालवीय चौक - शनि चौक - हनुमान चौक - आखाडा तालिम - काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा.

गरुड रथ मिरवणूक मार्ग

काळराम मंदिर पूर्व दरवाजापासून सुरुवात होऊन रामरथापाठोपाठ मरिमाता रोडने गौरी पटांगणापर्यंत रथ जाईल. तेथून रोकडोबा हनुमान मंदिर - गाडगे महाराज पुलाखालून - दिल्ली दरवाजा - नेहरु चौक - धुमाळ पॉईंट - मेनरोडने बोहोरपट्टी - सराफ बाजार - रामसेतू पुलाच्या पश्चिमेकडून कपुरथळा मैदान - म्हसोबा पटांगण - रामरथासोबत काळाराम मंदिर पूर्व दरवाजा पर्यंत मिरवणूक असेल.

वाहतूकीसाठी रस्ते बंद व पर्यायी मार्ग

  • मिरवणूक मार्गांवर मंगळवारी (दि.८) दुपारी २ ते मिरवणूक संपेपर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहील.

  • वाहनचालकांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

  • काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती

  • पंचवटी कारंजा मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजाकडून इतरत्र मार्गस्थ होतील वा काट्या मारुती

  • संतोष टी पॉईंट - द्वारका सर्कल - सारडा सर्कलमार्गे मार्गस्थ होतील.

काटेकोर पोलिस बंदोबस्त

  • पोलीस उपायुक्त - २

  • सहायक आयुक्त - ४

  • पोलीस निरीक्षक - ३०

  • सहायक/उपनिरीक्षक : ७५

  • अंमलदार : २००

  • स्ट्रायकिंग फोर्स - एक तुकडी

  • एसआरपीएफ - दोन तुकडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news