

नाशिक : गेल्या मे महिन्यापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९७.६ टक्के पावसाची नोंद झाली असून नांदगाव तालुक्यात सर्वाधिक १३४.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक हेक्टर शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने जिल्ह्यात दिलासा मिळाला आहे. मात्र, आधीच्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणांतील साठा समाधानकारक असून काही धरणे शंभर टक्के भरली आहेत. नांदूर मधमेश्वर धरणातून सध्या ६३१० क्युसेस विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने ८ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज व ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी शहरातील अनेक भागात रिमझिम पाऊस झाला तर काही भागात जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग
गंगापूर – २७६ क्युसेस
आळंदी – ८७ क्युसेस
होळकर पूल – ५११ क्युसेस
भावली – २०८ क्युसेस
भाम – ३३१ क्युसेस
दारणा – १२०० क्युसेस
वालदेवी – २४१ क्युसेस
कडवा – २११ क्युसेस
वाघाड – ३१६ क्युसेस
करंजवन – ३०१ क्युसेस
ओझरखेड – १२४ क्युसेस
पालखेड – ४२८ क्युसेस
तिसगाव – ७८ क्युसेस
नांदुर मध्यमेश्वर– ३१५५ क्युसेस
वाकी – बंद