

लासलगाव : भुसावळ-बडनेरा रेल्वेमार्गावरील भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वेस्थानकावर डाउन लूप लाइनचा विस्तार तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवारी (दि.30) ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे काही प्रवासी गाड्यांच्या वेळेत तात्पुरते बदल, काही गाड्यांचे नियमन तसेच काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत.
गाड्यांचे नियमन :
गाडी क्र. 20824 अजमेर-पुरी एक्स्प्रेस - सुमारे 2 तास 30 मिनिटे नियमन
गाडी क्र. 22710 अंब अंदौरा-हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस 2 तास नियमन
गाडी क्र. 11040 गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस - 2 तास नियमन
गाडी क्र. 12751 हजूर साहिब नांदेड-जम्मू तवी एक्स्प्रेस - 1 तास 30 मिनिटे नियमन
रद्द करण्यात येणाऱ्या गाड्या :
गाडी क्र. 61101 भुसावळ-बडनेरा मेमू - 30 जानेवारी 2026 रोजी रद्द
गाडी क्र. 61102 बडनेरा-भुसावळ मेमू - 30 जानेवारी 2026 रोजी रद्द
गाडी क्र. 11121 भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस - 30 जानेवारी 2026 रोजी रद्द
गाडी क्र. 11122 वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस - दि. 30 जानेवारी 2026 रोजी रद्द
गाडी क्र. 01211 बडनेरा-नाशिकरोड विशेष - 30 जानेवारी 2026 रोजी रद्द
गाडी क्र. 01212 नाशिकरोड-बडनेरा विशेष - 29 जानेवारी 2026 रोजी रद्द
रेल्वे प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी.
सदर ब्लॉक पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरण व प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असून, त्यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.