Nashik | अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर छापा ; रिक्षासह १९ सिलिंडर, गॅस मोटरपंप, वजन काटे जप्त

पंचवटी पोलिसांची कारवाई
Nashik | Raid Unauthorized Gas Filling Stations; 19 cylinders, gas motor pumps, weight forks seized along with the rickshaw
रिक्षासह १९ सिलिंडर जप्तfile photo
Published on
Updated on

पंचवटी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरणा केल्या जाणाऱ्या मालेगाव स्टँडवरील चिंचबनातील अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकत रिक्षासह घरगुती वापराची तब्बल १९ सिलिंडर जप्त केले असून, पुढील तपास पंचवटी पोलिस करत आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मंगळवारी (दि. १५) सायंकाळी हा छापा टाकला. चिंचबन परिसरातील मनपा शौचालयामागे गेल्या अनेक महिन्यांपासून शुभम सोनवणे हा बेकायदेशीररीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनात गॅस भरणा करत असल्याची माहिती कड यांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी अनधिकृत गॅस भरणा केंद्रावर छापा टाकला असता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने तो रिक्षात गॅस भरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे तपास करत असून शुभम सोनवणे याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजन्सीलाच जबाबदार धरण्याची मागणी

या कारवाईत रिक्षा क्रमांक (एमएच १५ ईएच ०२१४)सह १९ गॅस सिलिंडर, गॅस मोटर पंप, वजन काटे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घरगुती वापराचे गॅस सिलिंडर यांचा वितरकांकडून मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून, कुठल्याही गॅस एजन्सीकडून सिलिंडर बुक केल्यानंतर ग्राहकाला डिलिव्हरीचा मेसेज मिळाल्यानंतरही चार ते पाच दिवस सिलेंडर प्राप्त होत नाही. याच काळात या सिलेंडरमधील काही प्रमाणात गॅस काढून इतर सिलेंडर भरले जातात आणि यातून काळाबाजार होतो. त्यामुळे गॅस एजन्सीलाच धारेवर धरावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news