

नाशिक : आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर कर्तृत्वाचे नभांगण तेजोमय करणाऱ्या महिलांचा अग्रगण्य सन्मान दैनिक 'पुढारी'च्या वतीने शुक्रवारी (दि. २३) नारीशक्ती पुरस्काराने करण्यात येणार आहे.
जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आदिवासी विकास महामंडळ आयुक्त लीना बनसोड यांची प्रमुख उपस्थिती असेल.
इंदिरानगर परिसरातील हॉटेल एनराइज सयाजी येथे दुपारी ३ पासून हा सन्मान सोहळा रंगणार आहे. याप्रसंगी कला, क्रीडा, सामाजिक, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, बालहक्क, जाहिरात, कृषी, वैद्यकीय, पर्यटन आदी क्षेत्रांत लक्षवेधी कामगिरी बजावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील महिलांना गाैरविण्यात येणार आहे. हा सोहळा निमंत्रितांसाठी असल्याने संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 'पुढारी' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कलावती भिवा वाघ (सामाजिक),
सुवर्णा राहुल नागरे (कृषी),
शिवानी देसले (व्यावसायिक),
जयश्री अरविंद राठी (जाहिरात),
डॉ. काजल पटणी (योग),
आसावरी देशपांडे (सामाजिक),
मनीषा पोटे (जलसंधारण),
शोभा पवार (बालहक्क),
डॉ. दीप्ती देशपांडे (शिक्षण),
दुर्गा गुंजाळ (क्रीडा),
सोनिया भगवानदास ओचानी (उद्योजिका),
डॉ. वर्षा चिट्टीवाड (वैद्यकीय),
लीना समाधान पाटील (राजकीय),
मेनका चाैधरी (व्यावसायिक),
राखी आणि दीपाली बोरा (बांधकाम व्यावसायिक),
सविता करण गायकर (सामाजिक),
किमया उगले (लेखिका),
डॉ. भाग्यश्री शिंदे,
डॉ. हिमानी शिंदे (वैद्यकीय),
लक्ष्मीताई मोरे (कृषी),
पूजा गायधनी (ललित कला),
अर्चना कासलिवाल (राजकीय),
प्रियांका काकड (शिक्षण),
विजया देशमुख (शिक्षण),
डॉ. मनीषा आव्हाड (वैद्यकीय),
बबिता सूर्यवंशी (शिक्षण).