Nashik Politics | धनगर आरक्षणावरून महायुतीमधील सुंदोपसुंदी समोर; आरक्षणास झिरवाळांचा विरोध

आदिवासींमधून आरक्षण देण्यास झिरवाळांचा विरोध
Narhari Zirwal (नरहरी झिरवळ)
Member of the Maharashtra Assembly
Narhari Zirwal (नरहरी झिरवळ) Member of the Maharashtra Assemblypudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : राज्यात आरक्षण प्रश्नावरून मराठा ओबीसी वाद सुरू असतानाच आता धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्यात येत असल्यामुळे वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयाला आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीच विरोध दर्शवला असल्याने महायुतीमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. (While the dispute between Marathas and OBCs is going on in the state, another new dispute has arisen. Dhangar community has demanded reservation from tribal reservation. Ajitdada group leader Narahari Jirwal has opposed it)

झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विषय वर्षानुवर्षे सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे याबाबत आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. माझी सरकारला विनंती आहे की, जसे त्यांना बोलावले जाते तसे आम्हालाही बोलवावे. आमचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना बैठकीला बोलवायला हवे होते, अशी टिप्पणी केली.

ते म्हणाले की, मी विधानसभा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. आदिवासींच्या धर्तीवर आरक्षण देऊ असे म्हटले होते. पण आदिवासींमधूनच आरक्षण देण्याचा अट्टाहास का? सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. आम्ही सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहोत. विरोध करायचा की, न्याय मागायचा? हा निर्णय घेतला जाणार आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही आजही राजीनाम्यावर ठाम आहोत. आम्ही लवकरच पुढची भूमिका स्पष्ट करणार, असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.

पंढरपूर येथे धनगर समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून धनगर आणि धनगड एकच आहे, असा जीआर लवकरच काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. हा शासन निर्णय न्यायालयात टिकला पाहिजे. त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्याचे काम होणार आहे. यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सकल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून नेमली जाणारी समिती पुढच्या चार दिवसांत जीआरचा मसुदा तयार करेल. त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्यांचेही मत घेतले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

माझ्या सांगण्यावरूनच गोकुळ भेटला

दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटण्यासाठी गोकुळला (नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ) मीच पाठवले होते. जयंत पाटील माझा नेता आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचा सत्कार कर, असेदेखील गोकुळला आपणच सांगितल्याचा गौप्यस्फोट विधानसभा उपाध्यक्ष तथा अजित पवार गटाचे दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केला. तसेच शिंदे गटाकडून महाले इच्छुक आहेत, त्यांची भेट घेऊन निवडून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक. मात्र, अपक्ष लढून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढविणार असाल, तर निवडणूक लढवू नका, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news