

नाशिक : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी पक्षाच्या मुंबई नाका येथील कार्यालयात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक नामांकित कंपन्या यात सहभागी होणार असून गरजू व होतकरूंना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर सरचिटणीस मुन्ना अन्सारी अभिजीत मंचरकर व अंकिता पारक यांनी या नोकरी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. पंधरा हजार ते दीड लाखापर्यंत विविध कंपन्यांच्या पगाराच्या संधी या नोकरी महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. शहरातील व जिल्हाभरातील गरजू व होतकरू तरुणांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.