Nashik Politics | राष्ट्रवादीची स्वबळावर निवडणुकांची चाचपणी

संघटनात्मक विस्तारासाठी सभासद नोंदणी मोहिम सुरू
राष्ट्रवादीची सभासद नोंदणी मोहिम
हापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संघटनात्मक विस्तारासाठी सभासद नोंदणी मोहिम सुरू केली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संघटनात्मक विस्तारासाठी सभासद नोंदणी मोहिम सुरू केली आहे. सद्यस्थितीत महापालकेच्या ३१ प्रभागांमधील १२२ जागांवर स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अर्थात निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुतीच्या माध्यमातून याचा फैसला पक्षश्रेष्ठींच्या आदेशांनंतर घेतला जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला सुनावणी होत आहे. या सुनावणीनंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील या निवडणुक तयारीचा एक भाग म्हणून पक्ष संघटनात्मक बळकटीकरणासाठी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणी अभियानाला सुरूवात केली आहे. प्रदेश पदाधिकारी अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे व अर्जुन टिळे यांचा क्रियाशील सदस्यपदाचा अर्ज भरून घेत या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनामधून लाडकी बहीण योजना तसेच राज्य शासनाच्या सकारात्मक योजनांचा तळापर्यंत प्रसार करा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा असा सल्ला दिला. माजी मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख आमदारांसोबत लवकरच बैठका होतील. त्यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनमानसात जाऊन सभासद अभियान यशस्वी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सदस्य नोंदणीसाठी येथे संपर्क साधा

प्राथमिक अथवा क्रियाशील सदस्य होण्याची इच्छा आहे. अशा व्यक्तींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, मुंबई नाका, नाशिक येथे शहर सरचिटणीस संजय खैरनार ९८३४७८७४४० यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून महायुती अंतर्गत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचे आदेश आले तर त्या पद्धतीने कामकाज केले जाईल.

रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news