

येवला (नाशिक) : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुक्तागिरी बंगल्यावर शुक्रवार (दि.23) रोजी आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दराडे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार नरेंद्र दराडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे येवला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयातील महायुतीचे गणित आता वेगळ्या वळणावर जाणार आहे. भुजबळांना आता फक्त शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आव्हान उरले आहे.
यापूर्वी नरेंद्र दराडे यांचा राष्ट्रीय काँग्रेस कडून निवडणूक लढवत असताना 1999 च्या येवला लासलगाव विधानसभा निवडणुकीत अवघ्या 221 मतांनी शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांचे कडून पराभव झाला होता.
2004 मध्ये भुजबळांची एन्ट्री येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात झाल्याने येवले ची जागा काँग्रेस कडून राष्ट्रवादीला सोडण्यात आली. त्यानंतर नरेंद्र दराडे यांना म्हाडाचे अध्यक्ष पदही दिले होते. मात्र 2018 मध्ये दराडेंनी शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक लढवीत विजय मिळवला, आणि त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले.