fake documents to Bangladeshi woman-बांग्लादेशी महिलेला कागदपत्रे बनवून देणाऱ्यांचा शोध सुरू

बांग्लादेशी महिलेला कागदपत्रे बनवून देणाऱ्यांचा शोध सुरू
fake documents to Bangladeshi woman
fake documents to Bangladeshi womanfile photo
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे उघडकीस आलेल्या एका परकीय घुसखोर महिलेच्या प्रकरणाने आता एक नवे आणि अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. केवळ बनावट कागदपत्रे बनवून भारतीय व्यवस्थेला गंडा घालण्यापर्यंतच हे प्रकरण मर्यादित नसून, संबंधित महिलेने चक्क भारतीय लोकशाहीच्या अत्यंत पवित्र अशा मतदान प्रक्रियेतही सहभाग घेतल्याची धक्कादायक चर्चा आता संपूर्ण परिसरासह रंगू लागली आहे.

fake documents to Bangladeshi woman
Ratnagiri | केळशीतील वाळूच्या टेकडीचे अस्तित्व धोक्यात !

महिन्याभरापूर्वी पोलिसांनी या संशयित महिलेला आणि तिला मदत करणाऱ्या पतीला ताब्यात घेतले होते. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या महिलेकडे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा मिळून आला नाही. कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसतानाही ही महिला गेल्या पाच वर्षांपासून या भागात वास्तव्य करत होती, ही बाब तपासात स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून घेतले.

याच बनावट ओळखपत्रांच्या आधारे तीने एका नामांकित बँकेत खाते उघडून आर्थिक व्यवहारही सुरू केले. यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्राच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या महिलेचे नाव स्थानिक मतदार यादीतही समाविष्ट करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, या महिलेने मागील निवडणुकीत मतदानाचा अधिकारही बजावल्याची चर्चा केली जात आहे. एक परकीय नागरिक, जिच्याकडे कोणताही वैध पुरावा नाही, ती व्यक्ती मतदार यादीत नाव नोंदवण्यापर्यंत पोहोचतेच कशी? प्रशासकीय यंत्रणेने कागदपत्रांची पडताळणी करताना इतकी मोठी चूक कशी केली? असे संतप्त सवाल आता संगमेश्वरमधील सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत.

fake documents to Bangladeshi woman
छ. शाहू महाराज कालीन 'राजाज्ञापत्र' सापडले!

बनावट कागदपत्रांच्या जोरावर विविध शासकीय सोयी-सुविधांचा लाभ घेणाऱ्या या महिलेला नेमके कोणाचे पाठबळ लाभले, याचा छडा लावणे आता यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस आणि निवडणूक विभाग या अधिकृतरीत्या पडताळणी करणार का? आणि जर हे सिद्ध झाले, तर संबंधित दोषींवर काय कारवाई होणार? या प्रश्नांनी सध्या संगमेश्वर तालुका ढवळून निघाला असून जनतेतून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news