Nashik Police Recruitment | तिसऱ्या अपत्यामुळे पोलिस भरतीत माजी सैनिक अपात्र

१५३ उमेदवारांची आता वैद्यकीय चाचणी
Nashik Police Recruitment
तिसऱ्या अपत्यामुळे पोलिस भरतीत माजी सैनिक अपात्रfile photo
Published on
Updated on

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत शिपाई पदासाठी मैदानी व लेखी चाचणीत उत्तीर्ण होत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेला माजी सैनिक कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरला आहे. तीन अपत्य असल्याने संबंधित उमेदवाराचे पोलिस भरतीचे स्वप्न भंगले.

आयुक्तालयातील शिपाई पदाच्या ११८ रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भरतीसाठी पाच हजार ५९० पुरुष, दोन हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानुसार १९ ते ३० जूनदरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. त्यात ४ हजार ३७४ उमेदवारांनी मैदानी चाचणीत पात्र ठरले. त्यापैकी एक हजार १९७ उमेदवारांची ७ जुलैला लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी व मैदानी चाचणीच्या एकत्रित गुणांवरून प्रवर्गनिहाय अंतिम गुणवत्ता यादी तयार जाहीर केली. गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी मंगळवारी (दि. १६) बोलविण्यात आले होते. या पडताळणीत निवड यादीतील ११८ उमेदवारांपैकी ११४ जण पात्र ठरले. तर माजी सैनिक कोट्यातून निवड यादीत आलेल्या एका उमेदवारास तीन अपत्य असल्याने अपात्र ठरविण्यात आले.

अनुकंपावरील पोलिसही सहभागी

भरतीप्रक्रियेत ११४ जण शिपाई पदासाठी पात्र ठरले. तर अनुकंपा तत्त्वावरील ३९ वारसदारांच्या कागदपत्रांची ही अंतिम पडताळणी मंगळवारी करण्यात आली. त्यानुसार सध्या १५३ जण पोलिस शिपाई पदासाठी निवडण्यात आले आहेत. या सर्वांना ऑगस्टअखेरीस प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीदरम्यान, सण उत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या प्रशिक्षणार्थी पोलिसांचा बंदोबस्तासाठी वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिघे गैरहजर

निवड यादीतील ११८ पैकी ११५ उमेदवार हजर राहिले. तर तिघे गैरहजर होते. त्यापैकी एक आजारपणामुळे गैरहजर असल्याचे समोर आले. तर इतर दोघांनी कागदपत्रे सादरीकरणासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांत ते कागदपत्रे सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनुकंपाच्या ३९ उमेदवारांसह १५३ जणांची यादी वैद्यकीय चाचणीसाठी तयार करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news