Amit Shah Visit Nashik : केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्यामुळे पोलिस सतर्क

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी नाशिकमध्ये
Amit Shah, Minister of Home Affairs of India
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी (दि.२५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले असून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

गणेशोत्सव व ईद- ए- मिलादच्या बंदोबस्तानंतर शहरात केंद्रीय मंत्री शहा यांचा दौरा आयोजित केला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा सातपूर परिसरात होणार आहे. या मेळाव्याला गृहमंत्री शहा मार्गदर्शन करणार आहे. सातपूर परिसरातील हॉटेल तसेच, मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांच्या संख्येची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Amit Shah, Minister of Home Affairs of India
Amit Shah Nashik | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी नाशिकमध्ये

असा असेल बंदोबस्त

  • उपायुक्त - दोन

  • सहायक आयुक्त : तीन

  • पोलिस निरीक्षक : १५

  • सहायक निरीक्षक : ३०

  • पोलिस अंमलदार : ५००

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news