Nashik Police Force News | शहर पोलिस ताफ्यात ११० वाहने दाखल

Nashik Police Force : पोलिसांच्या ताफ्यात नव्याने ११० वाहने दाखल
New vehicles in police force
नाशिक : शहर पोलिस दलात नव्याने दाखल झालेली वाहने. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या ताफ्यात नव्याने ११० वाहने दाखल झाली आहेत. पोलिस गस्तीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची गरज असल्याने पोलिस दलात नव्याने ६२ चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच नाकाबंदी करण्यासाठी ३०० नवीन बॅरिकेड्सही प्राप्त झाले. (110 new vehicles have entered the fleet of Nashik city police.)

New vehicles in police force
Maharashtra Police Bharti 2024 | पोलिस भरतीसाठी दक्षता पथक सज्ज

गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयात नवीन वाहने पोलिसांच्या वाहन ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलिस मुख्यालयास वाहने सोपवण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख, सुधाकर सुराडकर यांच्यासह अजय बोरस्ते, विजय करंजकर, प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news