Nashik Flyover Speed Limit | गरवारे पॉइंट-आडगाव उड्डाणपूल मार्गावर वेगमर्यादा निश्चित

Nashik Flyover Speed Limit | दुचाकींसह काही वाहनांना प्रवेशबंदी
Nashik Flyover Speed Limit
Nashik Flyover Speed Limit
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने गरवारे पॉइंट ते आडगाव या दरम्यानच्या उड्डाणपूल मार्गावर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केली असून, काही प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

Nashik Flyover Speed Limit
illegal sand transportation : अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन हायवा जप्त

ही अधिसूचना शनिवार, दि. २० जून २०२६ पासून लागू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुजबळ फार्म ते के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय जुना उड्डाणपूल जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे.

त्यानंतर वाहतुकीचा वाढता वेग आणि सुरक्षिततेचा विचार करून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधारित वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार गरवारे पॉइंट ते आडगाव उड्डाणपूल मार्गावर हलक्या वाहनांसाठी ताशी ७० किलोमीटर, तर अवजड वाहनांसाठी ताशी ६० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Nashik Flyover Speed Limit
Nashik Illegal Cattle Transport | जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे गजाआड

सर्व वाहनचालकांना लेन शिस्त पाळणे बंधनकारक करण्यात आले असून, अवजड वाहनचालकांना अचानक लेन बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक उड्डाणपूल ते आडगाव उड्डाणपूल या मार्गावर दुचाकी, मोटारसायकल, सायकल, रिक्षा, तीनचाकी वाहने, स्पेशल व्हेईकल्स, बैलगाड्या, घोडागाड्या व हातगाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलिस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news