Nashik crime : कॉलेज रोडसह शहरातील विविध भागांत टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई; ११० जणांना घेतले ताब्यात

या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली
Nashik crime : कॉलेज रोडसह शहरातील विविध भागांत टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई; ११० जणांना घेतले ताब्यात
Published on
Updated on

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी टवाळखोरांविरोधात विशेष मोहीम राबवून दोन तासांत तब्बल 110 जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कॉलेज रोड, शिवाजीनगर, महात्मानगर आदी परिसरात काही काळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.

Nashik crime : कॉलेज रोडसह शहरातील विविध भागांत टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई; ११० जणांना घेतले ताब्यात
Gangapur News : गंगापुरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

या मोहिमेपूर्वी कॉलेज रोड पोलीस चौकी येथे गंगापूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ, झोन-1 मधील विविध पोलीस ठाण्यांचे डीबी पथक व क्राईम स्टाफ यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी झोन-1 च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहिमेबाबत आवश्यक सूचना दिल्या. यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत शिवाजीनगर, गंगापूर गाव, महात्मानगर, आनंदवली, कॉलेज रोड आणि डी. के. नगर परिसरात संयुक्त कारवाई करण्यात आली. संशयास्पदरीत्या फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजविणाऱ्या 110 टवाळखोरांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 112 व 117 अन्वये कारवाई करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात आले.

Nashik crime : कॉलेज रोडसह शहरातील विविध भागांत टवाळखोरांवर पोलिसांची धडक कारवाई; ११० जणांना घेतले ताब्यात
Sangli News : सांगलीत भर पावसात पोलिसांची धडक कारवाई

या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या 25 जणांवर, बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करणाऱ्या 7 वाहनचालकांवर तसेच बीएनएस कलम 285 अन्वये 3 जणांवर कारवाई करण्यात आली. गंगापूर पोलिसांनी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news