Nashik Pimpalgaon Baswant Election News : पिंपळगाव नगराध्यक्षपदी भाजपचे डॉ. मनोज बर्डे

आमदार दिलीप बनकर, भास्कर बनकर, तानाजी बनकरांना नाकारले
पिंपळगाव बसवंत (नाशिक)
पिंपळगाव बसवंत नगरपरीषद निवडणुकीत लक्षवेधी विजय मिळविल्यानंतर सेना-भाजप युतीचे नेते सतीश मोरे व नूतन नगराध्यक्षपदी निवडून आलेले मनोज बर्डे यांना डोक्यावर घेत काढण्यात आलेली विजयी मिरवणूक आणि आनंद व्यक्त करताना कार्यकर्ते.Pudhari News Network
Published on
Updated on

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : हेमंत थेटे

नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीने लक्षवेधी विजय मिळवत २५ पैकी १८ जागा जिंकत निर्णायक बहुमत प्राप्त केले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ. मनोज बर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णा गायकवाड यांचा ५ हजार मतांनी पराभव केला.

निवडणुकीच्या तोंडावर एकच आलेले आमदार दिलीपराव बनकर, माजी सरपंच भास्करराव बनकर, निसाकाचे माजी चेअरमन तानाजीराव बनकर यांना पिंपळगावच्या नागरिकांनी साफ नाकारले. तीन बनकरांची युती असताना राष्ट्रवादीला केवळ ७ जागा मिळाल्या. माजी सरपंच भास्करराव बनकर १०४ मतांनी तर तानाजी बनकर यांचे चिरंजीव गितेश बनकर यांचा ५८९ मतांनी पराभव झाला. नगरपरिषद निवडणुकीत गरज नसताना भास्कर बनकर व तानाजी बनकर यांच्याशी युती करत आमदार दिलीप बनकर यांनी पायावर धोंडा पाडून घेतल्याची चर्चा शहरात होत आहे. दरम्यान पिंपळगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. २५ पैकी १० जागा जिंकत शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद निर्विवाद सिद्ध केली. भाजपने ८ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ जागांवर विजय प्राप्त केला.

पिंपळगाव बसवंत (नाशिक)
Nashik Shinde Sena Victory : नाशिक जिल्हा शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला

प्रभागनिहाय निकाल असे

  • प्रभाग १ मध्ये भाजपचे ज्ञानेश्वर जोगारे (८८०) आणि कल्पना विधाते ( ८७९) विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश गायकवाड व जयश्री खोडे पराभूत झाले.

  • प्रभाग २ मध्ये शिवसेनेचे माणिक वाघ ( १११०) आणि श्वेता मोरे (११८७) विजयी झाले. राष्ट्रवादीच्या विष्णू गांगुर्डे व सुनिता पवार, राहुल पवार, गणेश शेवरे, उर्मिला पिठे पराभूत झाले.

  • प्रभाग ३ मध्ये शिंदे गटाचे सुजित मोरे (१२१८), सोनाली विधाते (१११५) विजयी झाले. राष्ट्रवादीचे दशरथ मोरे, लता विधाते, वृषाली आहिरराव पराभूत झाले.

  • प्रभाग ४ मध्ये शिंदे गटाच्या रेखा लभडे (१२१०) व इमरान कोतवाल (१२१७) विजयी झाले. राष्ट्रवादीच्या योगिता मोरे, भास्करराव बनकर, प्रियंका पुंड पराभूत झाल्या.

  • प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीचे अशोक दळवी (१२८६), शीतल मोरे (१३४३) विजयी झाले. रवींद्र ज्ञानेश्वर, मंगला मोरे यांचा पराभव झाला.

  • प्रभाग ६ मध्ये शिंदे गटाचे सिंधू गांगुर्डे (९०२), तौसिफ मन्सुरी (९३४) विजयी झाले. कावेरी गांगुर्डे, अमोल बागुल, राजेंद्र भवर, नितीन गांगुर्डे, सोनम ठाकरे, किरण गांगुर्डे पराभूत झाले.

  • प्रभाग ७ मध्ये भाजपचे प्रशांत मोरे (१२९१), सीमा कायस्थ (११६९) विजयी झाले. गीतेश बनकर, सपना बागुल पराभूत झाले.

  • प्रभाग ८ मध्ये भाजपच्या सुवर्णा वाघले (१२४७) आणि राष्ट्रवादीचे राहुल बनकर (९७२) विजयी झाले. दत्तू काळे, शीतल मोरे, सुनील आंबेकर, जयेश कुऱ्हाडे पराभूत झाले.

  • प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब आहिरे (११९२) आणि सोनाली जाधव (१२१९) विजयी झाले. उत्तम खैरनार, प्रतिभा पारख, रेखा विधाते, सचिन पगारे, भारत सूर्यवंशी पराभूत झाले.

  • प्रभाग १० मध्ये भाजपचे अनिता गांगुर्डे (२४६४), छाया पाटील (२७८८ ), सतीश मोरे (२७००) विजयी झाले. यमुना मोगल, वर्षा पाटील, नीलेश मोरे, भय्यासाहेब महाले, सोनम दाभाडे, फारुख शेख पराभूत झाले.

  • प्रभाग ११ मध्ये शिवसेनेचे मेघना पानपाटील (९३७), नीलेश पाटील (८९९) विजयी झाले. विद्या लोंढे, संजय मोरे, रेखा चव्हाण, आकाश साळुंखे, राजेश शिरापुरे पराभूत झाले.

  • प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादीचे अलका वार्डे, गणेश बनकर (११०८) विजयी झाले. जयाताई घुटे, चेतन घोडके पराभूत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news