Nashik Samruddhi Mahamarg | नाशिककरांसाठी मोठी खुशखबर! पांढुर्लीहून मिळणार 'समृद्धी महामार्गाची' थेट कनेक्टिव्हिटी

Nashik Samruddhi Mahamarg | मुंबई प्रवासातील 15 किमी.ने अंतर वाचणार; घोटीचा टोलही टळणार
Samruddhi Mahamarg Robbery
Samruddhi Mahamarg Robbery file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांचा मुंबईकडे होणारा प्रवास आता अधिक जलद, सुकर आणि किफायतशीर होणार आहे. नाशिक-इगतपुरी असा प्रवास करून समृद्धी महामार्गाला जोडले जाण्याऐवजी आता भगूरजवळील पांढुर्ली येथूनच समृद्धी महामार्गावर थेट प्रवेश मिळणार आहे. यासाठी उभारण्यात येणारा सुमारे २६ किलोमीटरचा पांढुर्ली कनेक्टर येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Samruddhi Mahamarg Robbery
Nashik ZP Election | नाशिक जिल्हा परिषद आरक्षणात मोठा बदल! ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का?

या जोडमार्गामुळे नाशिक शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांचे सरासरी १५ किलोमीटर अंतर कमी होणार असून, घोटी टोलनाक्याचा वळसा आणि टोलचा आर्थिक भुर्दंडही टाळता येणार आहे. विशेष म्हणजे, नाशिकरोड परिसरातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पांढुर्ली कनेक्टर अधिक जवळचा आणि सोयीचा पर्याय ठरणार आहे.

सध्या नाशिककरांना मुंबईकडे जाण्यासाठी नाशिक-इगतपुरीमार्गे समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा लागतो. इगतपुरी येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्यानंतर आमणे येथील हॉटेल शांग्रीला परिसरापर्यंत सुमारे ७६ किमी.चा प्रवास करावा लागतो. त्यानंतर पुढे मुंबईकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होतो.

या प्रवासात इगतपुरीपर्यंतचे अंतर, वाहतूक कोंडी आणि घोटी नाक्याचा टोल यांचा सामना करावा लागतो. मात्र, पांढुर्ली कनेक्टरमुळे ही परिस्थिती बदलणार आहे. नाशिक शहरातूनच पांढुर्लीमार्गे समृद्धी महामार्गावर जाता येणार असल्याने इगतपुरीपर्यंतचा वळसा टाळता येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनानुसार पांढुर्ली ते समृद्धी महामार्गाला जोडणारा सुमारे २६ किलोमीटरचा मार्ग विकसित करण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ३४३.९५ कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. निविदापूर्व बैठक पूर्ण झाली असून, आवश्यक जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू आहे. जमीन संपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

Samruddhi Mahamarg Robbery
Nashik ZP Election | नाशिक जिल्हा परिषद आरक्षणात मोठा बदल! ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का?

नाशिकरोडकरांना विशेष फायदा

या कनेक्टरचा सर्वाधिक व्यावहारिक फायदा नाशिकरोड, उपनगर आणि पूर्व नाशिकमधील नागरिकांना होण्याची अपेक्षा आहे. पांढुर्लीचे भौगोलिक स्थान या भागातील वाहनचालकांसाठी सोयीचे ठरणार आहे.

त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी शहरातून इगतपुरीच्या दिशेने जाण्याची गरज कमी होईल. वेळ, इंधन आणि प्रवासखर्चाची बचत होण्याबरोबरच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या दळणवळण व्यवस्थेला त्यामुळे नवी गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.