Nashik Panchavati Golibar : पंचवटीतील गोळीबारप्रकरणी 11 संशयितांना अटक

पंचवटी व भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध व गुंडाविरोधी पथकाची संयुक्तपणे कारवाई
 Firing
नाशिक गोळीबारpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पंचवटीतील गोळीबारप्रकरणी पंचवटी व भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध व गुंडाविरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाई करत 11 संशयितांना अटक केली. मात्र, गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, विकी उत्तम वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पंचवटीतील राहुलवाडी (फुलेनगर) येथे बुधवारी (दि. १७) मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास ओट्यावर बसलेला सागर विठ्ठल जाधव याच्यावर विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून पिस्तुलातून गोळीबार केला होता. यात जाधवला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी योगेश माधव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीचा गुन्हा पंचवटी ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पंचवटी व भद्रकाली पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून मानवीकौशल्य व तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील संशयित वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी व फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यावर सपळा रचून या सर्वांना म्हणजे एकूण ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

 Firing
Nashik Golibar : वर्चस्ववादातून नाशिकरोडला गोळीबार

ताब्यात घेतलेले संशयित असे...

  • नीलेश बाळ पवार (२७, रा. राजेय अपार्टमेंट, मेहेर धाम, म्हसरूळ)

  • आकाश गहुल निकम (२४, राजेय अपा., म्हसरूळ)

  • रोशन राजेंद्र आहिरे (३०, प्लॉट नं- ०७, कर्णनगर, पेठ रोड)

  • सचिन मोतीराम गांगुर्डे (२१, गजानन चौक, फुलेनगर, पंचवटी)

  • इरफान सागिर खाटीक (४४, जयवंत सोसायटी

  • आकाश पेट्रोल पंपाजवळ, म्हसरूळ)

  • आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे (३०, पालिका बाजारसमोर, शनिमंदिराजवळ, पेठ रोड)

  • आदित्य दिनेश आहिरे (२२, रा. शिंदेनगर, मखमलाबाद)

  • नितीन रमेश खलसे (३२, रा. वैशालीनगर, पंचवटी)

  • साहिल फिरोज शेख (२१, वैशालीनगर, पंचवटी)

  • भारत मुंकुद्र कंकाळ (२५, राजेय सोसायटी, मेहेरधाम)

  • योगेश भीमराव जाधव (२९, राहूलवाडी, पेठरोड)

संशयितापैकी नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, योगेश भीमराव जाधव, विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार, सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिरसाठ, सत्यवान पवार, ज्ञानेश्वर मोहिते, पथकातील कर्मचाऱ्यांनी पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news