Nashik Online Gambling News | शाळकरी मुले 'ऑनलाइन तिर्रट'च्या विळख्यात

चितांजनक! शहरभर जुगाराचे अड्डे : पालक चिंतेत, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी
Online Teen Patti, Jugar Adda
तीन पत्तीfile photo
Published on
Updated on

नाशिक : रोलेट नावाच्या ऑनलाइन जुगाराने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, आता 'ऑनलाइन तिर्रट' या नव्या जुगाराने तरुणाईला विशेषत: शाळकरी मुलांना आपल्या विळख्यात घेतले आहे. या जुगाराचे अड्डे शहरभर सर्रास सुरू असून, त्यात चक्क शाळकरी मुलांचा राबता बघावयास मिळत आहे. यामुळे पालकवर्ग चिंतेत असून, पोलिसांनी धडक कारवाई करून हे अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (The new gambling 'Online Tirat' has taken the youth especially the school children in its grip)

तीन पत्तीसारख्या या जुगाराला आतापर्यंत अनेक तरुण बळी पडले आहेत. त्यात त्यांची लाखो रुपयांची लूट झाली आहे. हा ऑनलाइन जुगार अगदी 10 रुपयांपासून खेळता येत असल्याने, त्यात शाळकरी मुलेही ओढली जात आहेत. सुरुवातीला 10 रुपयांपासून तिर्रट खेळणारी ही मुले नंतर मात्र हजारो रुपये या जुगारात गमावत आहेत. पैसे मिळविण्यासाठी घरात चोरी करण्याचे प्रकारही या मुलांकडून होत आहेत. तसेच उसनवाऱ्या, खोटे बोलून पैसे घेणे आदी प्रकारही होत आहेत. शहरात या जुगाराचे अड्डे सर्रास सुरू असून, त्याकडे पोलिसांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष तर केले जात नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

असा आहे ऑनलाइन तिर्रट

ऑनलाइन तिर्रट जुगाराचे अड्डे शहरभर असून, तो खेळण्याची पद्धत सोपी असल्याने त्याकडे शाळकरी मुले आकर्षित होत आहेत. जुगार अड्ड्यावर संगणकाच्या मॉनिटर आकाराचे चार ते पाच टीव्ही स्क्रीन लावले जातात. त्यावर राजा, राणी आणि गुलाम अशी तीन पत्ते झळकविले जातात. स्क्रीनच्या खाली असलेल्या बटनांवर विशिष्ट रक्कम ठेवून आता पुढचा पत्ता राजा, राणी किंवा गुलामच असेल अशा स्वरूपाची बोली लावली जाते. बटन दाबताच स्क्रीनवरील पत्ते बदलले जातात. बोली लावलेल्या पत्त्याप्रमाणे स्क्रीनवर पत्त्यांचा क्रम झळकल्यास रकमेच्या दुप्पट पैसे मिळतात. जर पत्त्यांचा क्रम बदलला, तर पैसे गमवावे लागतात.

तिघांकडून आत्महत्येचा प्रयत्न

तिर्रट या जुगारामुळे उद्ध्वस्त झालेल्या तीन मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील एकाने थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहीत आपबिती सांगितली आहे. तसेच यात पोलिसही कसे सहभागी आहेत, याचाही उल्लेख त्याने पत्रात केला आहे. शहरातील सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड या विभागांत सुरू असलेल्या अड्ड्यांची माहिती त्याने या पत्रात दिल्याचे समजते.

मुलांच्या स्वभावात होणारे बदल

खोटे बोलणे, सतत पैशांची मागणी करणे, नातेवाइकांकडून कोणत्याही बहाण्याने पैसे उसनवारी करणे, घरात चोरी करणे, घरातील मौल्यवान वस्तू गायब करणे, मित्रांकडे पैशांची सातत्याने मागणी करणे आदी प्रकार या मुलांकडून केले जातात. तसेच ही मुले नैराश्यालाही बळी पडतात. यात विशेषत: बेरोजगार मंडळी गोवली जात असल्याचे समोर येत आहे.

शहरात अशा प्रकारचे ऑनलाइन जुगार सुरू असतील, तर त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. यापूर्वीच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना आपापल्या हद्दीत अशा प्रकारचे जुगार सुरू असतील, तर त्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. आता नव्याने याबाबतची माहिती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या जातील.

प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news