

सिन्नर (नाशिक) : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी (दि.13) सुमारे 62 वाहनांतून 1200 क्विंटल कांद्याची आवक झाली. मुसळगाव येथील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या कांदा शेतमालास लिलावात सर्वाधिक 1,861 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतकर्यांनी कांदा व धान्य भुसार शेतमाल बांधावर परस्पर विक्री न करता बाजार समिती आवारातच विक्री करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे बाजार समिती कार्यालयातून रोख पेमेंट वाटप होत असल्याने निःसंकोचपणे शेतमाल बाजार आवारात विक्रीसाठी आणावा.
गणेश घोलप, सभापती, कृउबा समिती सिन्नर, नाशिक.
दरम्यान कांद्याच्या दर्जानुसार सरासरी 1,550 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव राहिले. सभापती गणेश घोलप यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता लिलाव सुरू करण्यात आले. लिलावाच्या वेळी बाळासाहेब चकोर, दिलीप खिंवसरा, बाबूशेठ लढ्ढा, सुनील पन्हाळे, विजय तेलंग, पप्पू गोळेसर आदी सुारे 15 व्यापारी उपस्थित होते. शेतकर्यांनी लिलावानंतर बाजार समिती कार्यालयातून मालाचे रोख पेमेंट मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. कांदा बाजारभाव दररोज कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. केंद्र सरकारने 20 टक्के निर्यातशुल्क रद्द केल्यास शेतकर्याला कांदा शेतमाल विक्रीस आशादायक वातावरण निर्माण होईल. उत्पादन खर्चात वाढ होताना मिळणार्या दरात घसरण होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.