

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवण, मालेगाव, बागलाण, त्र्यंबक, निफाड, दिंडोरी आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांची बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमध्ये कार्यरत गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या रिक्त झालेल्या जागांवर शासनाने तत्काळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
आर. ओ. वाघ (कळवण)
सी. सी. साबळे (मालेगाव)
ए. जे. पाटील (बागलाण)
जी. एम. लेंडी (त्र्यंबकेश्वर)
टी. बी. जाधव (निफाड)
बी. एस. रेंगडे (दिंडोरी)
डी. ए. कोतवाल (नांदगाव)
एस. जी. पाठक (सहायक, नांदगाव)
एन. एस. पाटील (जावळी, सातारा)
ए. जी. पवार (धरणगाव, जळगाव)
लता गायकवाड (मुरबाड, ठाणे)
श्रीकिसन खातळे (अंजनगाव सुर्जी, अमरावती)
महेश पाटील (चोपडा, जळगाव)
नम्रता जगताप (शहापूर, ठाणे)
संदिप दळवी (कोपरगाव, नगर)