

नाशिक : 350 बेड्स, 100 आयसीयू बेड्स असलेले उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 'किम्स मानवता' मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्याची घोषणा किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. राज नगरकर यांनी केली. अकरामजली इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असून, याठिकाणी सर्व प्रकारचे उपचार केले जाणार आहेत.
मुंबई नाका परिसरातील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नगरकर म्हणाले की, नाशिककरांना सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात किम्स आणि मानवता यांनी भागीदारीतून किम्स मानवता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. हॉस्पिटलची उभारणी करताना 10 वर्षांनी कोणत्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल, याचा विचार करून सर्वाधिक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविताना हॉस्पिटल 'फ्युचर रेडी' झाले आहे. याठिकाणी रुग्णांना कुठल्याही चाचणी किंवा उपचारासाठी हॉस्पिटलबाहेर जाण्याची गरज नाही. प्रदीर्घ अनुभव असलेली डॉक्टरांची व पॅरामेडिकल टीम रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर असणार आहे. 'ट्रीटमेंट फॉर ऑल' या संकल्पनेवर काम करताना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला कुठलाही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही. मेडिक्लेम, शासकीय योजनांचे लाभार्थी, राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना किम्स मानवताच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश सिंग, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. नितीन कोचर, डॉ. प्रतीक्षित महाजन, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. ललित लवणकर आदी उपस्थित होते.
आगामी सिंहस्थ कंभमेळ्याचा विचार करून हॉस्पिटलमध्ये सर्वात मोठा आपत्कालीन विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात मास कॅज्युअल्टी हाताळण्याची क्षमता असणार आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये मदर चाइल्ड केअर विभाग कार्यान्वित असणार आहे. तसेच एलडीआरपी माध्यमातून एकाच रूममध्ये प्रसूती व त्या पश्चातच्या सेवा पुरविल्या जाणार आहेत.