

नाशिक : दररोज सकाळच्या पोपटपंचीमुळेच जनता वैतागली आहे. त्यामुळे विरोधकांमध्येही राहायला कोणी तयार नाही. लोकांचा विश्वास विरोधकांवर नाही, तर मोदी आणि फडणवीसांवर आहे. म्हणूनच भाजपकडे येण्याचा ओघ वाढला आहे असा उपरोधिक टोला मंत्री महाजन यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला.
सिंहस्थ बैठकीसाठी मंत्री महाजन गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजप स्वबळावर नाही, तर महायुतीत लढेल. महापालिका निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकेल. आमच्या पक्षात प्रवेश होत आहेत. याचा विचार विरोधकांनी करावा. आगामी महापालिका निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकणार. येत्या 8 ते 10 दिवसांत काय चमत्कार होतात ते बघा. विरोधी पक्षातील नेते खालच्या थराला जाऊन बोलतात म्हणूनच लोक म्हणतात की, यांचा इलाज झाला पाहिजे, त्यामुळेच आमच्या प्रक्षात प्रवेश होत आहेत. नाशिक महापालिकेत 122 जागा असताना महायुती 100+ जागा जिंकेल असा दावाही मंत्री महाजन यांनी केला.