Nashik News | रुग्णाच्या सलाइनमध्ये आढळली अळी, प्रकरण थेट विधानसभेत

चौकशीचे करण्याचे आश्वासन
orm found in patient's saline
रुग्णाच्या सलाइनमधील अळी प्रकरण थेट विधानसभेत, चौकशीचे आदेश File Photo

नाशिक : शहरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल लहान मुलाच्या सलाइनमध्ये अळी निघाल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी (दि. २८) विधानसभेत आवाज उठविला. या प्रकरणी सलाइन पुरवठा करणारी कंपनी तसेच सह्याद्री रुग्णालयाची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी चर्चेअंती दिले.

नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल लहान मुलाच्या सलाइनमध्ये अळी निघाली होती. रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर आ. फरांदे यांनी यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली. एका उपचार घेणाऱ्या लहान मुलाच्या सलाइनमध्ये अळी निघणे ही गंभीर बाब असून, याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येणार का, असा प्रश्न फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच अशा प्रकाराने चुकीचे उपचार करूनही रुग्णाकडून पैसे वसूल करणाऱ्या हॉस्पिटलवरदेखील कारवाई करणार का? असा प्रश्न त्यांनी केला. यावर मंत्री आत्राम यांनी उत्तर देताना संबंधित रुग्णालय व निकृष्ट दर्जाचे औषधे पुरवठा करणारी कंपनी यांची माहिती घेऊन याबाबत चौकशी करण्यात येईल. दोषींवर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news