

इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत धामणी येथे डांगी व जातिवंत जनावरे व कृषी प्रदर्शन भरविण्यात आले.
कृषी प्रदर्शनात धामणगाव येथील संतोष गाढवे यांचा वळू चॅम्पियन ठरला, गाढवे यांना प्रथम बक्षीस पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, तर गाय प्रजातीमध्ये धामणी येथील करण भोसले यांची गाभण गायीला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
बक्षीस वितरण शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे आयोजक उत्तम भोसले व धनंजय भोसले यांनी परिश्रम घेतले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार निर्मला गावित, माजी सभापती संपतराव काळे, उत्तम भोसले, धनंजय भोसले, जनार्दन माळी, उदय जाधव, सुनील वाजे, रघुनाथ तोकडे, कचरू डुकरे उपस्थित होते.
धामणी गावाने डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले आहे हे कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे या डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी शासनाकडून निधी कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करू.
विजय करंजकर, उपनेते, शिवसेना, सिन्नर, नाशिक.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी अमोल भोसले, हृषिकेश भोसले, मयूर भोसले, अंकुश भोसले, पांडुरंग भोसले, डॉ. अमोल भोसले, ग्रामसेवक शरद केकाणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी इगतपुरी पशुसंवर्धन, पशुधन निवड समिती तसेच टाकेद खेड गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.