Nashik News | नाईक संस्था निवडणुकीला राजकीय रंग ?

पारंपरिक विरोधकांत माजी आमदारांचे आव्हान उभे राहणार
K.V.N Naiks
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. File Photo

नाशिक : कै. वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पॅनलची उभारणी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड हे या निवडणुकीमधील पारंपरिक विरोधक असतानाच माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार अशोक धात्रक यांच्या एन्ट्रीने निवडणुकीला राजकीय रंग चढताना दिसत आहे. कै. व्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणूक आखाड्यात सध्यातरी चार पॅनल होण्याची स्थिती आहे. यामध्ये विद्यमान अध्यक्ष थोरे, सुभाष कराड यांचे एक पॅनल, माजी अध्यक्ष आव्हाड, उदय घुगे यांचे एक तसेच 'नामको'चे संचालक हेमंत धात्रक, तानाजी जायभावे यांचा आणि मनोज बुरकुले, अभिजित दिघोळे यांचे एक पॅनल तयार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या निवडणुकीत थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिवीर पॅनलने आव्हाड यांच्या प्रगती पॅनलचा धुव्वा उडवला होता. २९ पैकी फक्त दोनच जागांवर 'प्रगती'ला समाधान मानावे लागले होते. त्यापैकी हेमंत धात्रक अवघ्या एका मताने विजयी झाले होते. त्यात आता चार पॅनल भिडल्यास मतविभागणीतून काट्याची टक्कर होईल, याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे.

सांगळे, दराडे निवडणुकीपासून लांबच

व्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणुकीपासून सिन्नरचे उदय सांगळे आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार किशोर दराडे तसेच त्यांचे बंधू माजी आमदार नरेंद्र दराडे हे अंतर राखून असल्याचे दिसून येत आहे. ही नातेसंबंधांमधली निवडणूक असल्याने कोणापासून दुरावा नको या तत्त्वाने अलिप्ततेचे सूत्र अवलंबले गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news