

सिडको (नाशिक) : गेल्या दोन वर्षांत नाशिक जिल्ह्यात वीस हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात लवकरच मोठ्या आयटी प्रकल्पासह दोन ते तीन मोठे उद्योग येणार असुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) व मैत्रीचे चेअरमन दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘क्वॉलिटी सिटी नाशिक’ अभियानाअंतर्गत आयोजित ‘नाशिक गुणवत्ता समर्पण’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी कुशवाह शनिवारी (दि.26) रोजी नाशिकमध्ये आले होते.
पत्रकारांशी बोलताना कुशवाह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, बारा हजार कोटींची गुंतवणूक निश्चित झाली असून, आठ हजार कोटींची गुंतवणूक मार्गावर आहे. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी दोन ते तीन मोठ्या उद्योगांशी बोलणी सुरू आहे.
सहा महिन्यांत हे उद्योग नाशिकमध्ये येतील. इच्छुक कंपन्यांची नावे सध्या उघड केली जाऊ शकत नाही. कारण केवळ जिल्ह्यांतच नव्हे, तर राज्यांमध्येही प्रकल्प खेचण्याची स्पर्धा सुरू होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिकमध्ये मोठा आयटी उद्योग येत असून त्या माध्यमातून दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या उद्योगापाठोपाठ अन्य आयटी उद्योगही नाशिकमध्ये येतील, असा विश्वास कुशवाह यांनी व्यक्त केला.
क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘क्वॉलिटी सिटी नाशिक’ अभियानाअंतर्गत आयोजित ‘नाशिक गुणवत्ता समर्पण’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी कुशवाह शनिवारी नाशिकमध्ये आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी दोन ते तीन मोठ्या उद्योगांशी बोलणी सुरू असून, सहा महिन्यांत हे उद्योग नाशिकमध्ये येतील. मोठ्या उद्योगांकडून पुण्याला प्राधान्य दिले जाते. इच्छुक कंपन्यांना जोपर्यंत भूखंड दिला जात नाही, तोपर्यंत त्यांची नावे उघड केली जाऊ शकत नाही. कारण केवळ जिल्ह्यांतच नव्हे, तर राज्यांमध्येही प्रकल्प खेचण्याची स्पर्धा सुरू असते, असेही कुशवाह म्हणाले. तसेच नाशिकमध्ये मोठा आयटी उद्योग येत असून त्या माध्यमातून दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या उद्योगापाठोपाठ अन्य आयटी उद्योगही नाशिकमध्ये येतील, असा विश्वास कुशवाह यांनी व्यक्त केला.
क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे चर्चासत्राचा आयोजन करण्यात आले होते. नाशिकला क्वॉलिटी सिटी बनवण्याचा उपक्रम गतिमान झाला असून भारताला क्वॉलिटी कॅपिटल बनवण्यासाठी नाशिक हा पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकास, शिक्षण व स्वच्छता या माध्यमातून सुरुवात करण्यात आली होती. त्यात आता गुणवत्ता समर्पण उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य व एमएसएमइ या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी शहरातील ४८ संस्थांचा सहभाग घेण्यात आला असून लवकरच नाशिक क्वॉलिटी सिटी म्हणून देशाच्या नकाशावर आपल्या कामाची दिशा दाखवून देईल, असा विश्वास चर्चासत्रातून उमटला.
प्रस्ताविकात जितूभाई ठक्कर यांनी नाशिक जिल्ह्याच्या अस्तित्वाला 155 वर्षे झाली असून 26 जुलै हा दिवस असल्याने यापुढे तो ''कॉलिटी डे'' म्हणून साजरा करण्यात येईल असे जाहीर केले.
यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, पेरिविंकल ग्रुपचे जॉईंट वेंचर पार्टनर व सॅमसोनाईट उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रमेश तैनवाला, युवा उद्योजिका विनिता मुंगी, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सेक्रेटरी चक्रवर्ती कानान, कॉलिटी कौन्सिल ऑफ नाशिकचे जितेंद्र ठक्कर आणि अध्यक्ष ललित बूब अदिंसह उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे काम होत आहे नाशिकच्या रस्त्यांच्या कामासाठी विशेष निधी राखून ठेवण्यात आला असून या माध्यमातून रस्ते दुरुस्ती करताना गुणवत्तेबाबत लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठीही कॉलिटी कौन्सिलची मदत घेऊन एसओपी तयार केली जाणार असल्याचे स्पष्ट केले