Nashik News | 'तुकडे-तुकडे गँग' उद्योगमंत्र्यांच्या रडारवर
नाशिक : सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांचे तुकडे केले जात असल्याने, नाशिकमध्ये येऊ पाहणाऱ्या मोठ्या उद्योगांना जागाच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता, 'तुकडे-तुकडे गँग' (TTG) चा अभ्यास करीत असून, पुराव्यानिशी काही बाबी सिद्ध झाल्यास थेट कारवाई करावी, अशा प्रकारचे पोलिस आयुक्तांना निर्देश देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Direct action on 'Tukde-tukde gang' should be taken if any matter is proved by evidence - Industries Minister Uday Samant)
नाशिकच्या अँकर इंडस्ट्री असलेल्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमधील मोठ्या कंपन्यांचे भूखंड ताब्यात घेऊन त्यांचे तुकडे करून अवाच्या सव्वा भावात त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामध्ये एमआयडीसीचे अधिकारीही सहभागी असल्याने, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या उद्योगांसाठी भूखंडच शिल्लक नसल्याची स्थिती आहे.
'तुकडा गँग' प्रथमच ऐकण्यात आले
एकीकडे मोठा उद्योग यावा ही आग्रही मागणी केली जात असताना, जागाच शिल्लक नसल्याने मोठा उद्योग येणार कसा? हादेखील प्रश्न आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी, आतापर्यंत 'कोयता गँग' ऐकून होतो. मात्र, 'तुकडा गँग' प्रथमच ऐकण्यात आले असून, या गँगचा अभ्यास करणार आहे. तसेच पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून, या गँगबाबत पुराव्यानिशी काही बाबी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे निर्देश देणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. उद्योगमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे तुकडे-तुकडे गँगचे धाबे दणाणल्याची उद्योग वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.
...तर गुन्हे दाखल करा
प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या प्लॉटविषयी उद्योगमंत्री म्हणाले, 'या प्लॉटवर सर्वस्वी अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे असे प्लॉट परस्पर विकले जात असतील तर थेट गुन्हे नोंदवावे, असे आदेश देणार असल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
'फ्री होल्ड'बाबत नो कमेंटस्
जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीअंतर्गत असलेले प्लॉट सद्यस्थितीत भाडेतत्त्वावर असून, ते फ्री होल्ड केले जावेत या उद्योजकांच्या मागणीबाबत विचारले असता, उद्योगमंत्री सामंत यांनी 'मागणी जाणून घेतली आहे' एवढेच सांगत फारसे बोलणे
कार्यकर्ते साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या RTI च्या दाखल अर्जात आढळतो 'तुकडे-तुकडे गँग' (TTG) चा उल्लेख
गृह मंत्रालयाने (MHA) एका आरटीआय प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की त्यांच्याकडे 'तुकडे तुकडे गँग' बद्दल "कोणतीही माहिती नाही" - हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी अनेक वेळा वापरला आहे.
कार्यकर्ते साकेत गोखले यांनी आरटीआय अर्ज दाखल केला होता. त्यांच्या आरटीआय अर्जात साकेत गोखले यांनी गृहमंत्री म्हटले आहे की, "अमित शाह यांनी नवी दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले आणि त्यांच्या भाषणात 'दिल्लीच्या तुकडे तुकडे गँगला धडा शिकवण्याची आणि शिक्षा करण्याची गरज आहे'," असे म्हटले आहे. गोखले यांच्या आरटीआयमध्ये 'तुकडे तुकडे गँग'चा तपशील आढळून येतो. गृह मंत्रालयाने साकेत गोखले यांच्या आरटीआय अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, "तुकडे-तुकडे टोळीबाबत गृह मंत्रालयाकडे कोणतीही माहिती नाही."

