Nashik News | सुनील तटकरे आज नाशिक दौऱ्यावर

Legislative assembly : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस मतदारसंघनिहाय बैठका
Sunil Tatkare
Sunil Tatkarefile photo
Published on
Updated on

नाशिक : सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दि. २८ व २९ जुलै रोजी येवला, निफाड, सिन्नर, दिंडोरी विधानसभा मतदारसंघात बैठका आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार असलेल्या निफाड तालुक्यात त्यांनी याचा कार्यक्रमाला हजेरी लावली. चांदवड येथे राज्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शहरातील देवळाली पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (दि.२७) भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

असा आहे नियोजित दौरा

रविवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजता तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी व विविध आघाडी प्रमुखांची बैठक होईल. दुपारी १२.१५ वाजता आमदार सरोज अहिरे व देवळाली विधानसभा समन्वयकांची ते बैठक घेतील. दुपारी दोन वाजता सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समवेत सिन्नर विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. दुपारी तीन वाजता कोपरगावकडे प्रयाण करतील. कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी सहा ते सात या दरम्यान येवला विधानसभा मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. सोमवारी (दि.२९) सकाळी दहा ते अकरा यादरम्यान निफाड येथे आमदार दिलीप बनकर यांच्या समवेत विधानसभा समन्वयकांची बैठक होईल. सकाळी अकरा ते साडेबारा या दरम्यान दिंडोरी येथे आमदार नरहरी हिरवाळ व विधानसभा समन्वयकांची बैठक होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news