

नाशिक : जेलरोड येथील पिंटू कॉलनीमध्ये देह व्यापारचे रॅकेट चालविणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गिरीष मधुसूदन देवळालकर असे संशयिताचे नाव आहे. या ठिकाणाहून पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई क्राईम ब्रँच युनिट वन व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरात अनैतिक देहव्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याबाबत मध्यवर्ती गुन्हेशाखे अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षास आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने (दि.२४) रोजी मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला उपनगर हददीत पिंटो कॉलनीत गजानन स्पर्श या बिल्डींगमधील एका फ्लॅटमध्ये एकजण महिलांकडून अनैतिक देहव्यवसाय करून घेत असलेबाबत हवालदार गणेश वाघ यांना गोपनिय माहिती मिळाली होती. या आधारे त्यांनी वरिष्ठांना सांगुन मार्गदर्शनाखाली वपोनि. डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला असता संशयित गिरीष मधुसूदन देवळालकर यास ताब्यात घेत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एक पिडीतेची सुटका केली. या प्रकरणी उपनगर ठाणे देवळालकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रविण माळी, हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे, प्रजित ठाकुर, अंमलदार वैशाली घरटे, योगेश परदेशी, युवराज कानमहाले, अतुल पाटील यांच्या पथकाने केली.