

चांदवड : येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्माचर्याश्रम संचलित श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नायपर, चंदीगड येथील संस्थेचे माजी संचालक डॉ. सरनजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे समन्वयक, सचिव झुंबरलाल भंडारी, समन्वयक ॲड. प्रकाशचंद बोकडिया यावेळी उपस्थित होते.
परिषदेचे आयोजन दरवर्षी फार्मसी कॉलेजतर्फे करण्यात येते. हे परिषदेचे सलग आठवे वर्ष आहे. यावेळी परिषदेचे समन्वयक डॉ. अतिश मुंदडा यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर उपासनी यांनी सर्वांचे स्वागत केले. परिषदेमध्ये डॉ. सरनजित सिंग, डॉ. प्रसाद ठाकूरदेसाई आणि डॉ. प्रवीण शेंडे यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेचे महत्त्व पटवून देताना डॉ. सरनजित सिंग यांनी "इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी" या विषयाचा ऊहापोह केला. परिषदेसाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून विविध संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक आणि रिसर्च स्कॉलर्स उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन झाले. विजेत्यांना सर्टिफिकेट आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सायंटिफिक रिसर्च पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रशांत या एमजीवीच्या विद्यार्थ्यांनी पटकावले. दुसरे पारितोषिक अविनाश मंडलोई या श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीच्या रिसर्च स्कॉलरला, तर तृतीय क्रमांकचे पारितोषिक एमईटी फार्मसी कॉलेजच्या पाटील नयनाला मिळाले. दुसऱ्या पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनमध्ये युज ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इन फार्मास्युटिकल सेक्टर या कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांकाचे रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस एमजीवी महाविद्यालयाच्या गौरी चौधरी, तर दुसऱ्या क्रमांकाचे तीन हजार रुपयांचे पारितोषिक निकिता भाबड हिने, तर तृतीय क्रमांकाचे रुपये एक हजारांचे पारितोषिक श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीच्या पीएच.डी. स्कॉलर शिल्पा बोराटे हिला मिळाले.