नाशिक : पंचायत समितीच्या कार्यालयात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने दिव्यांग महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समिती नाशिक शिक्षण विभागामध्ये हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी महिला, गट शिक्षण अधिकारी महिला तसेच शिक्षण विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक देखील महिला असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने प्रशासकीय कामाच्या बहाण्याने कार्यालयात येत महिलेवर अतिप्रसंग केला. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून अपंग संघटनांनी संशयितास अटक करण्याची मागणी केली आहे.