Nashik Crime News | सातवर्षीय चिमुकल्याची अपहरणानंतर हत्या

वडनेरभैरव येथील घटना; संशयित पोलिसांच्या ताब्यात
अर्पित भगत
अर्पित भगत pudhari network
Published on
Updated on

चांदवड : वडनेरभैरव (ता. चांदवड) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सातवर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा शनिवारी (दि.१७) दुपारी वडणेरभैरव गावालगत झाडाझुडपात संशयितरीत्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडली आहे. पोलिसांनी संशयित २० वर्षीय किशोर उर्फ (बाळा) बाळू मोकणे यास ताब्यात घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडणेरभैरव येथील राम मंदिराजवळ राहत असलेला अर्पितकुमार संतोष भगत (७) हा गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहनास गेला होता. ध्वजारोहणानतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास अर्पित घरी जाण्यासाठी रस्त्याने येत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. या संदर्भात संतोष भगत (३८, वडनेरभैरव, मूळ रा. देईपूर, फरीदपूर सिवान बिहार) यांनी वडणेरभैरव पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करीत सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला होता.

शनिवारी (दि.१७) दुपारी संशयित कोकणटेंभी परिसरात असल्याचे समजजात पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, मनमाडचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सुरज गुंजाळ, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक येथील डॉग स्कॉड पथक फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी आले होते. अर्पित भगतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित मेकाणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

अर्पित भगत
वडनेरभैरव गावातील वडार गल्लीतील झाडाझुडपात मृतदेह आढळलेल्या ठिकाणचा पंचनामा करताना पोलीस उपअधीक्षक सुरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे. (छाया : सुनील थोरे)

संशयिताकडून हत्येची कबुली

पोलिसांनी संशयित किशोर मोकणे यास खाक्या दाखवताच अर्पितकुमारचे अपहरण करून गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांने जवळील झाडाझुडपात नेत अर्पितचा मृतदेह दाखविला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news