Nashik News | ‘अवकाळी’ने दिलासा; 34 ने घटल्या टँकर फेर्‍या

तीन लाख लोकसंख्येसाठी धावताहेत 159 पाणी टँकर
Pune News |  Tanker
टँकरfile photo
Published on
Updated on

नाशिक : मे महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्ह्यात सर्वदूर बरसू लागलेल्या अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला फटका दिला असला तरी तो पाणीटंचाईत दिलासादायक ठरला आहे. पावसाने नदी-नाल्यांना पाणी वाहिल्याने भूजलपातळीत वाढ होऊन, 390 वर गेलेली टँकर फेऱ्यांची संख्या आता 356 वर आली आहे. आठवडाभरात 34 टँकर फेऱ्यात घट झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी 399 वर टँकर फेऱ्यांची संख्या गेली होती. यंदा प्रशासनाने ७७ विहिरींचे अधिग्रहण केले. सध्या जिल्ह्यातील 627 गावांतील दोन लाख 93 हजार 454 लोकसंख्येला 159 टँकरच्या माध्यमातून 356 टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवत आहे. तेथील १५३ गाव-वाड्यांना ६२ टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले जात आहे.तालुकागाव/वाड्याटँकर फेऱ्याबागलाण66चांदवड3534देवळा1210इगतपुरी7547कळवण80मालेगाव5425नांदगाव15362पेठ3025सुरगाणा2331सिन्नर9652त्र्यंबकेश्वर258येवला11052एकूण627356

जिल्ह्यातील टँकरची सद्यस्थिती

तालुका - गाव/वाड्या - टँकर फेऱ्या

  • बागलाण - 06 - 06

  • चांदवड - 35 - 34

  • देवळा - 12 - 10

  • इगतपुरी - 75 - 47

  • कळवण - 08 - 00

  • मालेगाव - 54 - 25

  • नांदगाव - 153 - 62

  • पेठ - 30 - 25

  • सुरगाणा - 23 - 31

  • सिन्नर - 96 - 52

  • त्र्यंबकेश्वर - 25 - 08

  • येवला - 110 - 52

  • एकूण - 627 - 356

चांदवड, सिन्नर, येवल्यात टँकर फेर्‍यात घट

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सिन्नर आणि येवला तालुक्यांतील टँकर फेऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. चांदवड तालुक्यात मागील सोमवारी ४१ टँकर फेऱ्या सुरू होत्या, सध्या त्या ३४ वर आल्या आहेत. सिन्नर तालुक्यातही टँकर फेऱ्यांची संख्या ५८ वरून ५२ वर आली आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक घट झाली असून, टँकर फेऱ्या ७३ वरून थेट ५२ वर आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news