Nashik News | 'एन-कॅप' अखर्चित निधीमुळे प्रधान सचिवांची नाराजी

महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी
National Clean Air Programme (NCAP)
National Clean Air Programme (NCAP)file photo
Published on
Updated on

नाशिक : वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एन-कॅप National Clean Air Programme (NCAP)) अंर्तगत हाती घेतलेल्या प्रकल्पांसाठी शासनाकडून प्राप्त निधी अखर्चित राहिल्याने राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी नाशिक महापालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली तसेच एन-कॅप अंतर्गत हाती घेतलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

एन-कॅप अंतर्गत हाती घतेल्या प्रकल्पांवरील निधी खर्चाबाबत प्रधान सचिवांनी गुरुवारी (दि.२९) व्ही.सी.द्वारे आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी एन-कॅपअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. एन-कॅपअंतर्गत केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला आतापर्यंत ८७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आतापर्यंत यातील ७५ टक्के निधी खर्च होणे अपेक्षित होते. परंतु जेमतेम ३५ ते ४० टक्केच निधी खर्च होऊ शकल्याने दराडे यांनी महापालिकेच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली. शासनाने निधी देऊनही महापालिका पर्यावरणविषयक कामांवर खर्च करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत सदर निधी तातडीने खर्च करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेश दराडे यांनी महापालिकेला दिले. यानंतर अतिरिक्त आयुक्त चौधरी यांनी एन-कॅपअंतर्गत विविध विभागांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर योजनांच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या

एन-कॅपचा जेमतेम ४० टक्के निधी खर्च

एन-कॅपअंतर्गत प्राप्त निधीतून महापालिकेच्या माध्यमातून विविध १७ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने रस्ता स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडू खरेदीवर ११.५० कोटींचा खर्च झाला आहे. आडगाव येथे इ-बस डेपो उभारण्याच्या २८ कोटींच्या प्रकल्पासाठी १५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. मात्र, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या विरोधामुळे बसडेपोचे काम रखडले आहे. त्यामुळे निधी खर्च होऊ शकलेला नाही. पंचवटीतील विद्युत शवदाहिनी, २० ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स, त्र्यंबक रोडवरील सायकल ट्रॅक, उद्यान विभागामार्फत दुभाजक तसेच रस्त्यांच्या कडेला वृक्षलागवडीचे कामही अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे जेमतेम ४० टक्केच निधी खर्च होऊ शकला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news