Nashik News | आषाढी एकादशी, मोहरमनिमित्त पोलिस सतर्क

आषाढी एकादशी, मोहरमनिमित्त शहरात बंदाेबस्ताचे नियोजन
Ashadhi Wari 2024
आषाढीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे सजलीPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : आषाढी एकादशी व मोहरम हे दोन्ही सण बुधवारी (दि. १७) साजरे होत असल्याने नाशिक शहर पोलिसांनी बंदाेबस्ताचे नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरातील सर्व धार्मिक स्थळांभोवती पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पहाटे चारपासून मध्यरात्री बारापर्यंत सर्व ठिकाणी पोलिसांचा पहारा राहणार आहे.

बुधवारी (दि.१७) आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरालगत पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच मोहरमनिमित्त सारडा सर्कल व देवळाली कॅम्पसह इतर ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठीही बंदोबस्त नेमला आहे. संबंधित पोलिस ठाण्यांसह प्रत्येक ठिकाणी गुन्हे शाखेची पथके साध्या वेशात तैनात राहणार आहेत. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १६) बॉम्बशोधक व नाशक पथकातर्फे महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. सर्व प्रमुख धर्मस्थळे, बस व रेल्वेस्थानकांमध्येही खबरदारी म्हणून तपासणी करण्यात आली. तसेच दोन्ही सणानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत परवानग्या देण्यात आल्या आहेत.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 | आषाढीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे सजली

पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त

सणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखांच्या विविध पथकांचा, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, दामिनी, निर्भया, बीट मार्शल यांचाही बंदोबस्त राहणार असून, गस्त सुरू राहणार आहे. पोलिसांसोबत होमगार्डचाही फौजफाटा बंदोबस्तात राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news