नाशिक : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभपूर्वक होणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच अनुप्रिया सिंह पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रकाश वाजे, डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, ॲड. माणिकराव कोकाटे, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.