नाशिक : काळजी घेणे गरजेचे; विद्यार्थ्यांचा सुरिक्षततेचा मुद्दा ऐरणीवर

मनपाच्या ८८ शाळा कॅमेऱ्याच्या नजरेत; खासगी शाळांमध्ये १०० टक्के सीसीटीव्ही
विद्यार्थी सुरिक्षतता
विद्यार्थी सुरिक्षतता image source - X
Published on
Updated on

नाशिक : बदलापूर येथील खासगी शिशुवर्गातील शालेय विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहरात एकूण ३०० शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामधील अनेक शाळांमध्ये शिशूवर्गापासून ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. साधारणत: बालवर्ग ते सातवपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. नाशिकमध्ये सध्या महापालिकेच्या १०० शाळा, असून त्यातील ८८ शाळा शाळा 'स्मार्ट' झाल्या आहेत. त्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. २०२२ मध्ये शासन पत्रकानुसार प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरेक्षेसाठी 'सखी सावित्री' समितीची स्थापना झाली. तिच्या अधिक प्रभावी अमलबाजवणीसाठी पुन्हा पत्रक काढण्यात आले आहे.

शहरातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेचे नियमावलीचे निकष अत्यंत चांगले असले तरी निकषांची पूर्तता आणि त्याची प्रभावी अमलबजावणी होणार का हा प्रश्न आहे. दरम्यान, नाशिक स्कूल असोसिएशनतर्फे संघटनेने सदस्य शाळांमधील स्कूल वाहनचालक तसेच इतर कर्मचारी यांच्यासाठी विशेष सुरक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाणार असल्याची माहितीही संघटनेचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी दिली आहे.

विद्यार्थी सुरिक्षतता
Dada Bhuse | आंदोलनामागे काेण हे चाैकशीतून समोर येईलच

मनपा शाळांमधील महत्वाचे सुरक्षा नियम

  • शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालक, मदतनीसांचे पोलिस व्हेरिफिकेशन गरजेच.

  • ड्रायव्हर व मदतनीस यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकाची नेमणूक.

  • स्कूलबसमध्ये महिलाच मदतनीस अनिवार्य.

  • शालेय परिसर, व्हरांडा, प्रत्येक वर्गात, शाळेच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर 'सीसीटीव्ही' अनिवार्य .

  • विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत, अशी वातावरण निर्मिती.

  • अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत असलेल्या 'ई-बॉक्स' या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या 'चिराग' ॲपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत सूचना फलक लावण्यात यावेत.

सर्वच शाळांमधील बालवर्गापासून ते किमान सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'गुड' व 'बॅड टच'चे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण कसे द्यावे, याचेही शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. शाळेतील सफाई कामगार, स्कूल बसचे चालक, वाहक आदी कर्मचाऱ्यांना शाळेत कामावर घेण्याआधी पोलिस व्हेरीफिकेशन व्हावे. सर्व शाळांमध्ये 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवण्यात यावे.

सचिन जोशी, अध्यक्ष नाशिक स्कूल असोसिएशन

महापालिकेच्या १०० पैकी ८८ शाळा स्मार्ट झाल्या असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा आहे. उर्वरीत १२ शाळांमध्ये 'एनजीओ'च्या माध्यामातून कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळांमधील 'सखी सावित्री' समितीसाठी पुन्हा एकदा परिपत्रक काढले आहे.

बी. टी. पाटील, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news