

जळगाव: भडगाव येथील महात्मा फुले प्रसारक मंडळाच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मधील नर्सरीतील दोन चिमुकले विद्यार्थ्यांचा मंगळवारी (दि.१६) सकाळी शाळेतल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला होता. भडगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिराने ज्ञानेश्वर रामदास वाघ यांनी दिलेल्या फिर्याद नोंदवण्यात आली. याप्रकरणी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका, संचालक आणि वर्गशिक्षक आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे .
भडगाव येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल कोठडी रोड भडगाव या शाळेत नर्सरीमध्ये शिक्षण घेणारे मयंक वाघ व अंश तहसीलदार या दोघांच्या काल शाळेशेजारी असलेल्या नाल्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी ज्ञानेश्वर रामदास वाघ राहणार भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेचे संस्थाचालक प्राचार्य वर्गशिक्षक व संचालक यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य व त्याच्या गुन्हा गुरन 463/2025 भा न्या स 2023 चे कलम 105 106 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी रवींद्र एकनाथ महाजन मनोज कौतिक महाजन रमेश एकनाथ महाजन विनोद शिवराम महाजन दीपक संभाजी महाजन या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनवणे हे करीत आहेत.
फिर्यादी ज्ञानेश्वर रामदास वाघ यांनी फिर्याद दिलेली आहे की, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये लहान मुलांचे शौचालय हे खोल नाल्याच्या बाजूला आहे. हा नाला पाण्याने भरून वाहत होता. दरम्यान लहान मुले शौचालयात गेली असता पाय घसरून नाल्यात पाण्यात पडून मृत्यू घडून येण्याचा संभव आहे याची जाणीव असून देखील शाळा प्रशासनाने याबाबात कोणतीही खबरदारी घेतली नाही मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय-४ वर्षे) व त्याचा वर्गमित्र अंश सागर तहसीलदार (वय-४ वर्ष) ही शाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत वर्गात नसताना देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यादरम्यान हे मुले शौचालयकडे गेले असता त्यांचा पाय घसरून ते नाल्याच्या पाण्यात पडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात सदोष मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.