Nashik News | मंत्री कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटिसा

जिल्हा बॅंक अनियमित कर्जवाटप; 2 एप्रिलला होणार सुनावणी
नाशिक
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटींच्या कर्जवाटपात १८२ कोटींची अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेच्या २५ माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटींच्या कर्जवाटपात १८२ कोटींची अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेच्या २५ माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.

Summary

सहकार विभागाने नोटीस मध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार ॲड. राहुल ढिकले, खासदार डॉ. शोभा बच्छाव या विद्यमान लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर दि. २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. माजी आमदार, खासदार व ज्येष्ठ संचालकांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेतील कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी कलम ८८ अंतर्गत चौकशी केली. नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुका यंत्रमाग औद्योगिक संस्था, आर्मस्ट्राँग साखर कारखाना, तसेच म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदी संस्थांना दिलेल्या कर्ज वितरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अडीच वर्षे चौकशी केल्यानंतर गौतम बलसाने यांनी २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकारी असे एकूण ४४ जणांवर १८२ कोटींची वसूली निश्‍चित केली होती. या सर्वांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या विरोधात माजी संचालकांनी तत्कालीन सहकार मंत्र्यांसमोर आपील केले असता, त्यास स्थगिती मिळाली होती. मात्र, सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सोपान आरोटे यांनी गुरुवारी (दि. २०) यातील २५ संचालकांनाच नोटीस बजावली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २० मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५२ अन्वये दाखल अपिल अर्जावर सुनावणी घेण्याची ही नोटीस आहे. सहकार मंत्र्यांकडील सुनावणीत काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

निश्‍चित अनियमितता (रक्कम कोटी)

माणिकराव शिंदे (०.६७) , माणिकराव कोकाटे (१.८७), नरेंद्र दराडे (८.८९), देविदास पिंगळे(८.६५), दिलीप बनकर (८.६५), राजेंद्र भोसले (८.७८), राघो अहिरे (८.८९), सुचेता बच्छाव (२.११), चंद्रकांत गोगड (१.३२), दत्ता गायकवाड (०.६७), नानासाहेब पाटील (८.७८), राजेंद्र डोखळे (८.८९), संदीप गुळवे (७.५७), शोभा बच्छाव (२.११), जे. पी. गावित (७.२१), माणिकराव बोरस्ते (७.०२), धनंजय पवार (७.५७), शिरिष कोतवाल (१.९८), वैशाली कदम (८.५४), वसंत गिते (१.८९), राहुल ढिकले (८.७६), गणपतराव पाटील (८.८९), डॉ. राहुल आहेर (०.४३).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news