Nashik News | हेल्थकेअर फंडातील गुंतवणूक सोळा हजार कोटींवर

आरोग्य, तंदुरुस्तीच्या क्षेत्राकडे निधीचा ओघ, वाढत्या गुंतवणूकीतून सुदृढ आरोग्यावर भारतीयांचा भर
healthcare fund
हेल्थकेअर फंडPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: भारतातील हेल्थकेअर म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणूक (एयूएम) एप्रिलअखेर सुमारे १६ हजार कोटी रुपयांवर पोहचली असून येत्या पाच वर्षात हा गुंतवणूक तब्बल ३० हजार कोटींवर जाण्याचा अंदाज विविध संशोधन संस्थांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षात स‌र्वाधिक चमकदार कामगिरी करणाऱ्या पाच क्षेत्रात हेल्थेकेअरचा समावेश आहे.

इक्विटी-केंद्रित तसेच एक्सचेंज-ट्रेडेड फंड (इटीएफ) यांचा प्रामुख्याने हेल्थकेअर म्युच्यूअल फंडात समावेश होतो. हे फंड औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा सेवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. आरोग्यसेवा क्षेत्रात औषध कंपन्या, रुग्णालये आणि निदान सेवा पुरवठादारांचा समावेश आहे. हे वैद्यकीय नवोपक्रम सध्या देशांतर्गत आरोग्यसेवा मागणी आणि जेनेरिक औषधांच्या निर्यातीतील प्रवाहांचे प्रतीक आहेत. एप्रिल २०२५ मध्ये म्युच्युअल फंडांनी आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध समभागांमध्ये २,१३४ कोटी रुपये गुंतवले आहेत. ही गुंतवणूक दरमहा वाढत चालली आहे.

मॅककिन्सेच्या २०२४ मधील संशोधनात उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीवर खर्च करण्यात भारतीय आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. यातून प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैली व्यवस्थापनाच्या बाबतीत झालेली जागरुकता सामाजिक बदल दर्शविते.

Nashik Latest News

वैद्यकीय महागाई दुप्पट

मध्यावधी वयाच्या टप्प्यावर मधुमेह, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंत त्याचबरोबर जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे वैद्यकीय खर्चात भर पडते. त्यामुळे वैद्यकीय आर्थिक नियोजनावर मोठा भार पडू शकतो. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे मेडिक्लेमचा प्रीमियमही वाढतो. परंतु या वाढत्या आरोग्यसेवेच्या खर्चाचे गुंतवणूकीच्या संधीत रूपांतर हेल्थकेअर फंडांमुळे शक्य झाले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील गुंतवणूक वैद्यकीय महागाईपासून संबंधित व्यक्तीसाठी नैसर्गिक बचावाचे काम करतेच. भारतात ही महागाई ऐतिहासिकदृष्ट्या एकूण महागाईच्या दुप्पट दरावर पोहचलेली आहे.

पोर्टफोलिओमध्ये आरोग्यसेवा क्षेत्र का आवश्यक

  • लोकसंख्येतील बदल : गेल्या शतकात भारतीयांचे आयुर्मान तिप्पटपेक्षा अधिक वाढले आहे. २०५० पर्यंत, भारतातील २१ टक्के लोकसंख्या ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाची असेल, असा अंदाज आहे. यामुळे औषधनिर्माण, निदान, गृहोपचार आणि विमा या क्षेत्रात दीर्घकालीन व्यवसाय संधी निर्माण होणार आहेत.

  • आरोग्यसेवा आयुष्यभराची गरज : बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत आरोग्यसेवेचा खर्च हा विविध आजारपणांमुळे प्रत्येक टप्प्यांवर बदलत जातो. बीसीजी या जगप्रसिध्द संस्थेच्या मते, सध्याच्या दशकात हृदयरोग आणि मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये ३४ टक्के वाढ तर कर्करोगाच्या घटनांमध्ये ४१ टक्के वाढ दिसून येईल.

  • वैविध्यपूर्ण गुंतवणूक विश्व : आरोग्य आणि तंदुरुस्त आरोग्य ही क्षेत्रे पारंपारिक औषध आणि रुग्णालयांच्या पलीकडे विस्तारलेली आहेत. त्यात क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन, कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन, मेडटेक, आरोग्य तपासणी, विमा, न्यूट्रास्युटिकल्स आणि फिटनेस ब्रँड आदी घटकांचा समावेश झालेला आहे. सुमारे २०० अब्ज डॉलर्सचे एकत्रित बाजार भांडवली मूल्य असलेल्या १०० हून अधिक लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

भारतीय औषधनिर्माण क्षेत्राचे जागतिक वर्चस्व

  • आफ्रिकेची ५० टक्के जेनेरिक औषधांची गरज भारत भागवतो.

  • अमेरिकेतील जेनेरिक औषधांमध्ये ४० टक्के वाटा भारताचा आहे.

  • ब्रिटनच्या २५ टक्के औषधांच्या गरजा भारत पूर्ण करतो

बीएसई हेल्थकेअर इंडेक्सने १, ३, ७ आणि १५ वर्षाच्या कालावधीत बीएसई ५०० इंडेक्सपेक्षा सरस कामगिरी बजावलेली आहे. हेल्थकेअर निर्देशांकात समाविष्ट कंपन्यांनी गेल्या १४ वर्षात बीएसई ५०० निर्देशांकातील कंपन्यांच्या तुलनेत कमाईत कितीतरी पटीने सरस कामगिरी बजावलेली आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीचा दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे क्षेत्र लाभदायक ठरु शकते.

संजय चावला, सीआयओ इक्विटी, बडोदा बीएनपी पारिबा म्युच्यूअल फंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news