

नाशिक : गोदावरी अर्बन को- ऑप. बँकेचा ३० वा वर्धापन दिन अक्षय्यतृतीयेला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, हितचिंतक उपस्थित होते.
१९९५ साली अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांनी स्थापन केलेल्या गोदावरी बँकेचे मुख्य कार्यालय नवीन पंडित कॉलनी येथे असून, बँकेच्या पाच शाखांसह दहा हजाराहून अधिक सभासद आहेत. बँकेच्या स्थापनेपासून बँकेस लेखापरिक्षणात 'अ' वर्ग मिळत असून, प्रत्येक वर्षी बँक सभासदांना लाभांश वाटप करीत आहे. दरम्यान, वर्धापन दिनासाठी आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले, गणेश बँकेचे अध्यक्ष शरद कोशिरे, प्रशांत जाधव, अनिल मटाले, नानासाहेब सोनवणे, अजय ब्रम्हेचा, पोपट सुराणा, ॲड. विलास गीते आदींनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेच्या माजी अध्यक्ष नीलिमा पवार, विद्यमान अध्यक्ष अमृता पवार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार, संचालक प्रणव पवार, सुरेश पाटील, ॲड. दत्तात्रय पिंगळे, डॉ. तानाजी कानडे, रवींद्र मणीयार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गव्हाणे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.