Nashik News | अनुसूचित जमातीच्या सहा विद्यार्थ्यांची विदेशवारी

नाशिक : अनुसूचित जमातीच्या सहा विद्यार्थ्यांची विदेशवारी
अनुसूचित जमाती
अनुसूचित जमातीच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार आहे. pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : दरवर्षी अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ६ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून ७ आदिवासी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज छाननीच्या बैठकीला आदिवासी विकासचे सचिव विजय वाघमारे, उपसचिव रवींद्र जाधव, आयुक्त नयना गुंडे, कक्ष अधिकारी ललितकुमार धायगुडे, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे विशेष कार्य अधिकारी सुनील लिलानी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सिस्टीम मॅनेजर उमेश कोकाटे आदी उपस्थित होते. अर्जांची पडताळणी करत उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ६ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. त्यापैकी ३ विद्यार्थी इंग्लंड, २ विद्यार्थी ऑस्ट्रेलिया तर १ विद्यार्थी जर्मनीत उच्च शिक्षणाचे धडे गिरवणार आहे. या विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली खर्च, इतर प्रासंगिक खर्च म्हणून अदा करावयाची प्रती वर्ष १५०० अमेरिकन डॉलर ही रक्कम त्या वेळी असलेल्या विनिमय दरानुसार त्या त्या देशाच्या चलनामध्ये अदा केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news