

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - श्री कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचे गेल्या काही दिवसांपासून मुल्यांकन केले जात असून, नुकतेच संस्थानला प्राप्त मौल्यवान धातुचे शासकीय मान्यताप्राप्त मुल्यांकन कर्त्यांच्या माध्यमातून मुल्यांकन करण्यात आले. त्यात तब्बल पाच लाख रुपयांचे सोने-चांदी भाविकांनी दान केल्याचे समोर आले आहे. संस्थानच्या इतिहासात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मौल्यवान वस्तूंचे मुल्यांकन करण्यात आले आहे.
कॅमेऱ्याच्या निगराणीत सोने-चांदीचे मुल्यांकन करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल संस्थानकडे सोपविण्यात आला आहे. मूल्यांकन केलेल्या दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्येपूर्ण दागिने बघायला मिळाले. यात नवसपूर्ती निमित्ताने दिलेले विविध सोने व चांदी वस्तू जसे घराची चांदीची प्रतिकृती, चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार, बेलपान, त्रिशूल इत्यादी दागिने मोठ्याप्रमाणात बघायला मिळाल्यात. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मिळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्यूशन करता आलेले नाही.
चेतन राजापूरकर, गव्हर्नमेंट अप्रुड व्हॅल्यूअर, नाशिक