Nashik News | नाशिकसाठी वाढवण ठरेल 'गेमचेंजर'

Vadhavan Port । उमेश वाघ : 2029 पर्यंत पहिले जहाज येणार, 'समृद्धी'मुळे नाशिकहून 102 किमी अंतर
नाशिक
नाशिकसाठी वाढवण बंदर 'गेमचेंजर' ठरणार आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : जगातील सातव्या क्रमांकाचे बंदर म्हणून पुढे येत असलेले वाढवण बंदर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी 'गेमचेंजर' ठरणार आहे. समृद्धीला वाढवण जोडले जाणार असल्याने नाशिक - वाढवण हे अंतर १०२ किमीवर येणार असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा नाशिकला होणार आहे.

Summary

२०३० पर्यंत वाढवण प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या गतीने काम सुरू आहे, ते बघता २०२९ मध्येच वाढवणला पहिले जहाज येईल, असा विश्वास वाढवण पोर्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उन्मेश वाघ यांनी व्यक्त केला.

नाशिक उद्योजक मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची विशेष उपस्थित होती. उन्मेश वाघ म्हणाले की, १८७३ मध्ये जेव्हा मुंबई बंदराची निर्मिती झाली, त्यानंतर 150 वर्षांनी जेएनपीटी बंदर बांधले गेले. महाराष्ट्रीयन उद्योजकांना त्याचा फायदा झाला नाही. मात्र, वाढवण बंदर महाराष्ट्राचे देशातील औद्योगिक स्थान पुढील ७५ वर्षे टिकवून ठेवणार आहे. वाढवण बंदर हा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्णत्वास आणण्याचे ठरले होते. मात्र, आम्ही सहा महिन्यांनी पुढे असल्याने, २०२९ पर्यंतच वाढवणला पहिले जहाज आणण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प उभारताना अवघ्या साडेचार महिन्यांत सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत. प्रारंभी भूसंपादनाला विरोध असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प समुद्रात हलविण्यात आला आहे. तब्बल १,४४८ हेक्टरवर हा प्रकल्प उभारला जात आहे. वाळू, सिमेंट, स्टील याची मुबलकता असल्याने, कंत्राटदाराकडून विलंब होण्याचे कुठलेही कारण शिल्लक नसल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.

तसेच वाढवण प्रकल्पापर्यंतच्या रस्त्याचे भूसंपादनही पूर्ण झाले असून, २४ गावांमधील ग्रामसभांमध्ये ठराव मांडून रस्त्यासाठी जमिनी दिल्या गेल्या आहेत. याशिवाय प्रकल्पाला लागणाऱ्या प्रशासकीय परवानग्यांचीही पूर्तता या साडेचार महिन्यांतच केल्याने, चीनपेक्षा अधिक गतीने हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत या प्रकल्पाचा कोणत्याही शहराला नाही तितक्या संधी नाशिकला असणार आहेत. कारण रस्ते, रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटीही या प्रकल्पाला जोडली जाणार असल्याने जगातील सर्व बंदरे, शहरे नाशिकच्या जवळ येणार आहेत. विशेषत: वेअर हाउसिंग आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संजय लोढा, अजय लोढा, सतीश पारख, जितेंद्र ठक्कर, अजिंक्य नहार, मनीष रावल आदी उपस्थित होते.

12 लाख रोजगारनिर्मिती

वाढवण बंदर प्रकल्पातून प्रत्यक्ष १२ लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार असून, अप्रत्यक्ष रोजगार एक कोटींहून अधिक असणार आहेत. एकूणच महाराष्ट्रातील बेरोजगारी पूर्णपणे दूर करण्यास हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याचेही उमेश वाघ यांनी सांगितले.

सिंहस्थात नाशिकचा विकास - डॉ. गेडाम

कार्यक्रमात संजय लोढा यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची मुलाखत घेतली. यावेळी डॉ. गेडाम यांनी सिंहस्थात नाशिकच्या विकासाला मोठी संधी असून, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. शहर वाढत असून, शहराच्या विकासात्मक गरजा वाढल्या आहेत. 12 वर्षांनी शहराला विकासाची मोठी संधी असून, विकास साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. तर आगामी सिंहस्थात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news