

नाशिक : शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नर्सरी (बालवाडी) केजी लहान आणि मोठा गट शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर पुस्तकसंचही त्याच शाळेतून घेण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे. विशेष म्हणजे, संचाची किंमत दोन हजार, तीन हजार इतक्या महाग दराने विकली जात आहे, ही लूट थांबवावी, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे तर काही पालक संघटना याविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
नर्सरी, 'केजी'ला २ हजार ते ३ हजारांचे पुस्तक संच
शाळेतूनच पुस्तके घेण्याची पालकांवर सक्ती
लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन, पालक संघटनाचा इशारा.
जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होता. त्याच्या दोन महिने अधीपासूनच शहरातील बालवाडी, नर्सरी, के.जी. प्रवेश प्रक्रिया सुरु होतात. शहरात लहान गटासाठी असणाऱ्या बालवाडी, केजी शाळांमध्ये प्रवेश घेताच विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा संच घेण्यासाठीही दवाब टाकला जात आहे. ती पुस्तकेही संबंधित शाळांमधून घ्यावी, यासाठी शहरातील बहुतांश शाळा प्रशासन पालकांवर सक्ती करत आहे. नर्सरी, पहिल्या वर्गाअधिच्या शाळांमधून १५ ते ५० हजारांपर्यंत वार्षिक फिस आकारली जात असताना पुस्तकांचा संच पालकांना वेगळे पैसे देऊन विकत घ्यावा, असे सांगितले जात आहे. तो त्याच शाळेतून घेण्यासाठीही पालकांवर दबाब टाकण्याचे काम खाजगी शाळांप्रशासनाकडून केले जात आहे.
दरम्यान, बालवाडी आणि केजीमध्ये विद्यार्थ्यांना अक्षर, अंक ओळखही नसते, त्यांना अनुभव अभिव्यक्ती, गाणी-खेळ यातून अनुभूतीआधारित शिक्षण देण्याची गरज असताना अनेक शाळा पालकांची अक्षरश; लूट करत आहेत, अशा प्रतिक्रिया सरकारी शाळांमधील निवृत्त शिक्षकांनी दिल्या.
नर्सरी-केजी पर्यंतच्या बहुतांश शाळा बेकायेदेशीर आहेत. त्या चालवण्यासाठी महिला बालकल्याण विभागाची परवाणगी लागते. ती अनेक शाळांनी घेतलेली नाही. या सर्व शाळा बंद कराव्यात. ११ जुन २००४ शासन निर्णयान्वये पालकांवर पुस्तक अमुक एका ठिकाणावरुन घेण्याची सक्तीकरु नये असा नियम आहे. बेकायदेशीर शाळांमधून पुस्तकविक्रींची भांडारे धंद्यासारखी चालवली जात आहेत. पालकांनी शाळेची दबाव झुगारुन द्यावे. याविरोधात लवकरच आंदोलन करण्याच्या तयारी आहोत.
नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंटस असोशिएशन
बालवाडी, केजीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाची मुळी गरजच नाही. त्यांना अंक,अक्षर ओळख नसते. संस्कार, नाच-गाणी, गोष्टी-कवितांमधून त्यांना हसतखेळत शिक्षण द्यावे. पुस्तके शिक्षकांसाठी असावी आणि अनुभूतीवर आधारित शिक्षण देण्याचे प्रशिक्षण अशा खेळवर्ग, बालवाडीच्या शिक्षकांना द्यावे.
विद्या मोहाडकर, उपक्रमशील माजी शिक्षिका, नाशिक.
मुलाला केजी वर्गात कॉलनेतील शाळेतच टाकले. बाहेर ही पुस्तकेच मिळत नसल्याचे सांगत तीन हजाराची पुस्तके शाळेतूनच घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
सोनाली पाटील, पालक